शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी म्हणतात, प्रत्येक मित्र असतो जिवलग

By admin | Updated: August 2, 2015 03:13 IST

व्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते.

आशिष दुबे  नागपूरव्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते. ते अनेक नात्यांपेक्षा मजबूत आणि विश्वासाचे असते. ते नाते आहे मैत्रीचे. याच कारणामुळे मैत्रीचा पाया भक्कम समजण्यात येतो.जेव्हा भेटतो तेव्हा मनापासून भेटतोआजकाल मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे होतात. माझा या दिवसांवर विश्वास नाही. कारण हे दिवस जेथे नाते संपुष्टात येत आहेत, तेथे साजरे करण्यात येतात. प्रत्येक दिवशी त्यांना आठवणे महत्त्वाचे आहे. मी याचे पालन करतो. माझ्या मित्रांची संख्या खूप मोठी आहे. यात प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज, उच्च शिक्षण, शासकीय सेवेत आल्यानंतर प्रशिक्षण अकादमीतील मित्रांचा समावेश आहे. या सर्व मित्रात सुब्रत गुप्ता मला सर्वात जवळचे आहेत. ते आमच्या बॅचचे अखिल भारतीय स्तरावरील ४ थे टॉपर होते. आम्ही सोबतच प्रशिक्षण घेतले. सेवेत आल्यानंतरही आमची मैत्री कायम आहे. आम्ही अनेक वर्षानंतर भेटतो तरीसुद्धा आमच्या मैत्रीतील ओलावा कायम आहे. आमच्यात व्हॉट्स अप सारखी मैत्री नाही. व्यक्तीच्या जीवनात मैत्री हे खास नाते असते. हे नाते कठीण प्रसंगी भक्कमपणे पाठीशी उभे राहते. सुब्रत आणि माझे अनेक मित्र आजही काही समस्या असल्यास एकमेकांना मदत करतात. - अनुप कुमार, विभागीय आयुक्तमित्रांमुळेच या पदावर आहोमाझ्या जीवनात मित्रांचे महत्त्व खूप आहे. मी आज ज्या पदावर आहो त्यात आईवडिलांसह माझ्या मित्रांचे महत्त्वाचे योगदान आहे. माझे मित्र नसते तर मी आज या पदावर राहिलो नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असे नाते असते जे अनेक नात्यांपासून वेगळे आणि महत्त्वाचे असते. कारण जीवनात अनेक बाबी आपण कुटुंबीयांसोबत शेअर करू शकत नाही त्या बाबी फक्त मित्रांसोबत बोलल्या जाऊ शकतात. मित्रच आपल्या समस्येला त्यांची समस्या समजतात. त्या सोबतच ती समस्या दूर करण्यासाठी खांद्याला खांदा लावून आपली साथ देतात. समस्यांचे समाधान करतात. तुम्ही त्यांचा सल्ला ऐकला, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास तुमच्या सगळ्या समस्या दूर होतात. माझ्या जीवनातही अनेक मित्र आले. आजही ते माझे मित्र आहेत. कोण्या एका मित्राचे नाव घेणे सर्वांसोबत अन्याय करणारे ठरेल. कारण माझ्या जीवनात प्रत्येक मित्राचे योगदान आहे. शाळेपासून आजपर्यंत माझ्या मित्रांनी माझी साथ देताना त्यांचा काय फायदा होईल हा विचार केला नाही. ते फायद्यातोट्याचा विचार न करता माझी मदत करीत राहिले. आजही मी माझ्या मित्रांची मनापासून आठवण करतो.-डॉ. श्याम वर्धने, नासुप्र सभापती