शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

एका अधिकाऱ्याकडे तीन पदाचा कार्यभार

By admin | Updated: May 9, 2014 02:35 IST

नगर परिषदेचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे कामे रेंगाळली असून नगर परिषदेत एखाद्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला ताटकळत राहिल्याशिवाय पर्याय नाही.

कामठी पालिका : सहा महिन्यांपासून मुख्याधिकारी नाही
बंडू नारनवरे■ कामठी
नगर परिषदेचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे कामे रेंगाळली असून नगर परिषदेत एखाद्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला ताटकळत राहिल्याशिवाय पर्याय नाही. एका अधिकार्‍याकडे तीन-तीन पदाचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेचा कार्यभार मुख्याधिकार्‍यांकडून चालविला जात असताना गेल्या सहा महिन्यांपासून स्थायी मुख्याधिकारी नाही.
कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांची यवतमाळ येथे बदली झाल्यानंतर या पदाचा प्रभार कळमेश्‍वरच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याकडे देण्यात आला. मात्र काही दिवसांतच त्यांच्याकडून हा प्रभार काढून नायब तहसीलदार संजय रामटेके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. काही दिवस त्यांच्याकडे हा पदभार ठेवल्यानंतर उमरेडचे मुख्याधिकारी देशमुख यांच्याकडे काही दिवसापूर्वी अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. देशमुख यांच्याकडे आता उमरेडसोबतच कामठी आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी अशा तीन पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते एकाही विभागाला बरोबर न्याय देऊ शकत नसल्याचा आरोप केला जात आहे.
नोव्हेंबर २0१३ ला स्थायी मुख्याधिकारी पांढरे यांची बदली झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून स्थायी मुख्याधिकारी न मिळणे हे या नगर परिषदेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. प्रभारी मुख्याधिकार्‍यांपैकी केवळ माधुरी मडावी यांनी पालिकेचा कार्यभार सांभाळण्याचा प्रयत्न केला.
मुख्याधिकार्‍यांसोबतच नगर परिषदेतील मुख्य लिपिक धानफुले यांच्याकडे कर विभाग प्रमुख व न्यायालयीन प्रकरण असे तीन कार्यभार देण्यात आले आहे. गाडकिले यांच्याकडे अंतर्गत लेखा परीक्षक व लेखापाल असे दोन कार्यभार सोपविण्यात आले आहे. बलराज नामपल्लीवार यांच्याकडे सभा लिपिकसोबतच कॅशियरचासुद्धा भार आहे. विद्युत निरीक्षक खाडे हे ३0 एप्रिलला सेवानवृत्त झाले असून त्यांचा हा कार्यभार आणखी कुणाकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात येईल, याबाबत अजून निश्‍चित केले नाही.
एकापेक्षा अधिक कार्यभार असल्याचा ताण येथील कर्मचार्‍यांच्या व अधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत आहे. २00६ पासून कामठी नगर परिषदेत एकूण २२ पदे रिक्त असून ती अद्याप भरण्यात आले नाही. येथील कर्मचार्‍यांना वेळेवर नियमितपणे पगार तर देण्यात येत नाही. उलट त्यांच्याकडे दोन-तीन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवून त्यांचा ताण वाढवत असल्याचा आक्रोश येथील कर्मचार्‍यांमध्ये दिसून येत आहे.