शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी एकजूटीतूनच बहुजनांचीच सत्ता

By admin | Updated: November 21, 2015 03:33 IST

या देशातील ओबीसी समाज हा एकजूट नाही. तो विखुरला असल्यामुळेच देशातील बहुजन समाज सत्तेपासून दूर आहे. या देशात बहुजनांची सत्ता येऊ नये म्हणून तो तसाच विखुरलेला राहावा,.....

बसपा विदर्भ आढावा बैठक : प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांचे प्रतिपादननागपूर : या देशातील ओबीसी समाज हा एकजूट नाही. तो विखुरला असल्यामुळेच देशातील बहुजन समाज सत्तेपासून दूर आहे. या देशात बहुजनांची सत्ता येऊ नये म्हणून तो तसाच विखुरलेला राहावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. ज्या दिवशी या देशातील ओबीसी समाज एकजूट होईल, त्यादिवशी या देशात बहुजनांची सत्ता येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केले. बहुजन समाज पार्टीची विदर्भस्तरीय कार्यकर्ता आढावा बैठक शुक्रवारी मराठी साहित्य संकुल सभागृह सीताबर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृष्णा बेले, प्रेम रोडेकर, जितेंद्र म्हैसकर, प्रदेश प्रवक्ता सागर डबरासे, नागोराव जयकर, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, नरेश वासनिक, राजकुमार बोरकर, रूपेश बागेश्वर, गौतम गेडाम, संजय जयस्वाल, उत्तम शेवडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विलास गरुड म्हणाले, बसपा ही देशातील सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम करीत आहे. परंतु ज्याप्रमाणे दलित व आदिवासी समाज एकजूट दिसून येतात तसा ओबीसी समाज नाही. याला अनेक कारणे आहेत. मात्र ओबीसी समाजाने एकत्र येऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ओबीसी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजूनही ओबीसी समाजापर्यंत पोहोचले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकरांना ओबीसी समाजापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचे मित्र कोण, आणि शत्रू कोण आहेत, हे पटवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उत्तर प्रदेशात बसपाची संघटन बांधणी अधिक मजबुत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बसपा कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीवर अधिक जोर द्यावा. पक्षातून काढण्यात आलेली काही मंडळी माझ्यावर विविध आरोप करीत आहेत. त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक कृष्णा बेले यांनी केले. संचालन जितेंद्र म्हैसकर यांनी केले. (प्रतिनिधी)