शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे

By नरेश डोंगरे | Updated: July 26, 2024 22:36 IST

Nagpur News: वरच्या भागातून रेल्वे गाडीची देखरेख करता यावी आणि काही धोका आहे का, ते तपासता यावे म्हणून मध्य रेल्वेने ठिकठिकाणच्या एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) वर सोलर कॅमेरे लावले आहे.

- नरेश डोंगरे नागपूर - वरच्या भागातून रेल्वे गाडीची देखरेख करता यावी आणि काही धोका आहे का, ते तपासता यावे म्हणून मध्य रेल्वेने ठिकठिकाणच्या एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) वर सोलर कॅमेरे लावले आहे.

अलिकडे रेल्वेगाड्यांच्या अपघातात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वेगाडीच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. खालच्याच नव्हे तर गाडीच्या वरच्याही भागाची सातत्याने पाहणी करता यावी, यासाठी आता रेल्वे प्रशासनाने नागपूर विभागातील १७ रेल्वे स्थानकांवरच्या एफओबी वर सोलर कॅमेरे लावले आहे. हे कॅमेरे अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणे-येणे करणाऱ्या रेल्वे गाड्यांवर नजर ठेवणार आहेत. ते गाड्यांवरील पॅन्टोग्राफच्या स्थितीचे निरीक्षण करतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅक्शन पॉवर कंट्रोल रूममध्ये ते कनेक्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे गाडीच्या वरच्या भागाचे ते सातत्याने निरीक्षण नोंदवणार आहेत.

रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टममुळे धावत्या गाड्यांच्या पॅन्टोग्राफमध्ये काही अडकल्यास किंवा खराबी आल्यास या कॅमरातून ते लगेच कळणार आहे. त्यामुळे गाडी थांबवून लगेच दोष दूर करण्यास मदत होणार आहे. तातडीने दोष दूर केले जाणार असल्याने रेल्वे वाहतूकीतील व्यत्यय तातडीने दूर करण्यास मदत होणार आहे.

या स्थानकांच्या ब्रीजवर लागले कॅमेरेहे कॅमरे नागपूर विभागातील नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, घोडाडोंगरी, बैतूल, आमला, परासिया, मुलताई, पांढुर्णा, काटोल, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांंवरील फूट ओव्हर ब्रीजवर लागले आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर