शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता मालमत्ता कर किमान ५00 रुपये

By admin | Updated: May 13, 2014 00:59 IST

गेल्या अनेक वर्षांंपासून नागपुरात कुणावर वार्षिक ४0 रुपये तर कुणावर १00 रुपये मालमत्ता कर आकारला जात होता.

नागपूर : गेल्या अनेक वर्षांंपासून नागपुरात कुणावर वार्षिक ४0 रुपये तर कुणावर १00 रुपये मालमत्ता कर आकारला जात होता. अशा मालमत्ता कराचा महापालिकेने अभ्यास केला. यानंतर किमान मालमत्ता कर ५00 रुपये आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम आम जल कर वगळून आहे. यासंबंधीचा निर्णय कर संकलन व वसुली समितीने घेतला होता. त्याला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे शहरातील सुमारे ७५ हजार गरीब नागरिकांवर कराचा भुर्दंंड पडणार आहे. आता संबंधित प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर केला जाईल.

संबंधित निर्णयामुळे महापालिकेला ३ कोटी २५ लाख रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर विभाग गेल्या वर्षभरापासून ५00 रुपयांपेक्षा कमी कर भरणार्‍यांची यादी तयार करण्याच्या कामी लागला होता. ही यादी तयार झाली तेव्हा तब्बल ७५ हजारावर घरांवर नाममात्र कर आकारला जात असल्याचे समोर आले. त्यामुळे किमान ५00 रुपये कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सांगितले की, मालमत्ता कर हस्तांतरणासाठी(नामांतरण)पूर्वी ४५0 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, स्थायी समितीने एक हजार रुपये घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. प्रशासनाने तीन हजार रुपये नामांतरण शुल्क वसुलीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संबंधित प्रस्ताव अधिक होता. यामुळे कर संकलन व वसुली समितीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. सार्वजनिक नळ लावणे, त्यावर जल कर आकारणे तसेच कचरा, दूषित पाणी गोळा करून त्यावर कर आकारण्याचे निर्देश आयुक्त देतात. मात्र, नव्या महापालिका कायद्यानुसार स्थायी समितीने असा निर्णय घेतला आहे की, सार्वजनिक नळांवर जल कर लावण्याचा अधिकार जलप्रदाय विभाग तसेच साफसफाई कर, मलप्रवाह कर लावण्याचा अधिकार आरोग्य विभागाला दिले जावे. (प्रतिनिधी)