शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
4
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
5
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
6
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
7
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
8
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
9
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
10
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
11
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
12
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
13
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
14
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
15
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
16
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
17
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
18
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
19
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
20
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘नो रिंग’, फक्त ‘ई-टेंडरिंग’

By admin | Updated: May 13, 2014 00:57 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणार्‍या कंत्राट प्रणालीसाठी आता ‘ई-टेंडरिंग’चा उपयोग करण्यात येणार

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणार्‍या कंत्राट प्रणालीसाठी आता

विद्यापीठाचा पसारा फार मोठा असल्यामुळे निरनिराळ्या कामांसाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर कंत्राट प्रक्रिया राबवली जाते. यात प्रिंटिंग, कॅटरिंग, तांत्रिक बाबी, संगणक इत्यादी प्रकारच्या बाबींसाठी निविदा मागविण्यात येतात. परंतु अनेकदा काही ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राट देण्यात येत असल्याचे आरोप होत होते. बहुतांश आरोपांमध्ये तथ्य नसले तरी यामुळे विद्यापीठाचे नाव नाहक खराब होत होते.

राज्यातील विद्यापीठांनी जास्तीतजास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यपाल तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले होते; शिवाय कंत्राट पद्धत पारदर्शक करण्याची मागणीदेखील समोर येत होती. या बाबी लक्षात घेऊन विद्यापीठात यावर अनेक दिवसांपासून मंथन सुरू होते. अखेर प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी

आता नवीन प्रक्रियेनुसार निविदा ऑनलाईन मागविण्यात येणार आहेत. शिवाय

‘ई-टेंडरिंग’चा उपयोग करण्यात येणार आहे. कंत्राट प्रणाली पारदर्शक राहावी व कुठल्याही व्यवहारात गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ही पद्धत वापरण्यात येणार आहे. याअंतर्गत ‘ऑनलाईन’ पद्धतीने देशपातळीहून निविदा सादर करता येणार आहेत. सोबतच केवळ फोनवरुन ‘रिंग’ करून कामे पदरात पाडू घेण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.‘ई-टेंडरिंग’च्या पद्धतीला हिरवी झेंडी दाखवली. ‘ऑनलाईन’ प्रणाली असल्यामुळे कुलगुरूंसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्‍यांना यावर लक्ष ठेवता येणार आहे. या पद्घतीमुळे निविदांमधील गैरप्रकार दूर होण्यास मदत होईल. या ‘ई-टेंडरिंग’मुळे निविदांच्या कामात पारदर्शकता येणार आहे; शिवाय अनेक कंत्राटदारांची ‘मोनोपली’ संपुष्टात येईल. देशस्तरावरील कुठलाही कंत्राटदार निविदा सादर करू शकणार आहे. यात वेळेची बचत तर होणार आहेच, पण त्याबरोबर कार्यक्षमताही वाढणार आहे. विशेष म्हणजे या कामाचे उत्तरदायित्वही निश्‍चित होणार असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)