शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आता उद्योग उभारणे कठीण, एमआयडीसीने जमिनीची किंमत वाढवली; दरकपातीची उद्योजकांची मागणी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 13, 2024 21:32 IST

जमिनीच्या किमतीसोबतच गुंतवणुकही वाढल्याने उद्योजकांना नव्याने उद्योग उभारणे कठीण झाले आहे.

नागपूर : विदर्भात औद्योगिक क्षेत्रात विकासाची गती कमीच आहे. त्यातच एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रातील जमिनीची किंमत वाढल्याने उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जमिनीच्या किमतीसोबतच गुंतवणुकही वाढल्याने उद्योजकांना नव्याने उद्योग उभारणे कठीण झाले आहे.हिंगण्यात ५४० तर बुटीबोरीत २५० रुपये चौ.मीटर भाव वाढलेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमिनीची किंमत वाढविल्याने हिंगणामध्ये २,८४० रुपये चौरस मीटर, तर अतिरिक्त बुटीबोरी आणि बुटीबोरी टप्पा-२ मध्ये २ हजार रुपये चौरस मीटर भाव झाले आहेत. हिंगण्यात ५४० रुपये तर बुटीबोरीत २५० रुपये चौ.मीटर भाववाढ झाली. बुटीबोरी आणि नवीन बुटीबोरी हे औद्योगिक क्षेत्र उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे म्हणून उद्योग संघटनांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जमिनीचे दर कमी करण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या बुटीबोरी आणि नवीन बुटीबोरीमध्ये जागा खरेदी करण्यासाठी कुणीही उद्योजक पुढे येत नसल्याचे उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. लहान उद्योजकांना आकर्षित करायचे असल्यास त्यांना कमी दरात जागा उपलब्ध करून द्याव्या लागतील.विदर्भाच्या अन्य भागात २०० ते ७५० रुपये चौ.मीटर भावविदर्भातील अन्य जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील जमिनीची किंंमत २०० ते ५००-७५० रुपये चौ.मीटर आहे. गडचिरोलीमध्ये २०० रुपये, गोंदिया, २५० रुपये, चंद्रपूर २५० ते ५५०, भंडारा २५० ते ७९०, वर्धा ३०० ते ५०० रुपये, अमरावती ३०० ते १,५८० रुपये, अकोला ३०० ते ९०० रुपये, बुलढाणा ३०० ते ४००, यवतमाळ ३०० ते ४०० रुपये, वाशिममध्ये ३०० रुपये चौ.मीटर भाव आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीVidarbhaविदर्भ