शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आता बोर्इंग नव्हे एअर इंडियाचा एमआरओ

By admin | Updated: June 7, 2015 03:05 IST

बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालन करण्यास नकार दिला.

नागपूर : बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालन करण्यास नकार दिला. त्यामुळे आता या प्रकल्पाचे संचालन एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मिहानमधील एअर इंडियाच्या देखभाल व दुरुस्ती केंद्राची (एमआरओ) पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात पीएमओ कार्यालयाशी संपर्क साधल्याचे गडकरी म्हणाले. मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.आर. जगन्नाथ, नागपूर एमआरओचे महाव्यवस्थापक व्ही.जी. पाटील, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रकाश गजभिये, आ. मिलिंद माने उपस्थित होते. ६५० कोटींचा एमआरओकरारानुसार बोर्इंगने ६५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एमआरओची उभारणी केली. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जानुसार बांधकाम केले आहे. एमआरओचे मुख्यद्वार २२ कोटींचे असून जर्मनी येथील अभियंत्यांनी एक महिन्यात उभारले आहे. एमआरओला १० मे २०१५ रोजी डीजीसीएची परवानगी मिळाली असून प्रारंभी बोर्इंनच्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. दोन हँगरमध्ये बोर्इंगच्या बी-७७७ आणि बी-७८७ यासारख्या मोठ्या विमानांची दुरुस्ती करण्यात येईल. युरोपमधील एअर बस कंपनीच्या विमानांच्या दुरुस्तीसाठी डीजीसीएकडे परवानगी मागितली आहे. परवानगीनंतर एअर बस कंपनीची ए-३२० आणि ए-३८० यासारख्या सहा छोट्या विमानांची दुरुस्ती एमआरओमध्ये एकाचवेळी करता येईल. दक्षिण-पूर्व आशियातील बोर्इंगच्या विमानांसाठी हा एमआरओ सक्षम असल्याचे गडकरी यांनी सांगितले.