शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटर कापण्यापूर्वी मिळणार सूचना

By admin | Updated: August 17, 2014 00:51 IST

एसएनडीएल संदर्भात वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी फुटाळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एसएनडीएलच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक जनता

प्रशांत पवारांच्या प्रयत्नांना यश : मनसे, एसएनडीएल अधिकाऱ्यांचा जनता दरबारनागपूर : एसएनडीएल संदर्भात वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी फुटाळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एसएनडीएलच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यात मीटर कापण्यापूर्वी ग्राहकांना १५ दिवस आधी सूचना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.वीज ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले. जनता दरबारात फुटाळा वस्तीतील ३०० नागरिकांनी आपल्या समस्या एसएनडीएलचे अधिकारी तसेच मनसेचे प्रशांत पवार यांच्यापुढे मांडल्या. या भागातील ग्राहकांच्या मीटरचे केवळ दोन महिन्यांचे रिडींग घेऊन सातत्याने सहा-सहा महिने देयके पाठविण्यात येत होती. या तक्रारी करणाऱ्या ग्राहकांची मीटर तपासणी करून त्यांना सुधारित देयके देण्यात आली. याशिवाय अ‍ॅव्हरेज देयक फक्त दोन महिन्यापुरते देण्यात येईल, ही बाब अधिकाऱ्यांनी मान्य केली. त्याच प्रमाणे मीटर कापण्यापूर्वी ग्राहकांना १५ दिवस आधी सूचना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे अ‍ॅव्हरेज देयक आल्यास एसएनडीएलचे अधिकारी गौरव गुप्ता यांच्याशी संपर्क साधून सुधारित देयक घ्यावे, तोवर वीज देयकाची रक्कम भरू नये आणि अशा प्रकरणात मीटर कापण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मीटर बदलविताना नवे मीटर नि:शुल्क लावण्यात येईल. सूर्योदयापूर्वी कुणीही मीटर तपासण्यास येणार नाही. आल्यास मनसेच्या कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बीपीएल ग्राहकांना ३० युनिटपर्यंत ७६ पैसे आकारण्यात येतात. परंतु प्रशांत पवार यांनी बीपीएल ग्राहकांना १५० युनिटची मागणी केली. हे ऊर्जा मंत्रालयाचे काम असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यावर पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मनसेच्यावतीने बुधवारपासून नागपूरात जनता दरबार घेण्यात असून पुढील जनता दरबार बुधवारी सुरेंद्रगड, गुरुवारी गिट्टीखदान, शुक्रवारी फ्रेंड्स कॉलनी, शनिवारी झिंगाबाई टाकळी, मानकापूर, गोधनी, सोमवारी गड्डीगोदाम, मंगळवारी भोईपुरा, बुधवार दक्षिण नागपूर, गुरुवार उत्तर नागपूर येथे होईल.जनता दरबारात एसएनडीएलचे अधिकारी, प्रशांत पवार यांनी फुटाळा वस्तीतील सुनंदा डोंगरे, गुणाबाई ठवकर, रमाबाई आत्राम, अनसूया भालेकर, रामदास धुर्वे, गंगाधर कटरे यांच्यासह असंख्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले. यावेळी मनसेचे मिलिंद महादेवकर, राकेश बांगरे, संतोष गौर, ललित गुहे, भरत डोंगरे, सुखदेव उमरेडकर, सतीश चौकसे, शांती गोरवणे, स्मिता उईके, सीमा मडावी, मयुरी कावेरी, नामदेव चौधरी, रवि वराडे, मोहन पथे, पप्पू अंधारे, अजय डबीर, मंगेश पात्रीकर, मंगेश सुरावार उपस्थित होते. (प्रतिनिधी)