शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आनंदम प्रकल्पाची अडवणूक महानगरपालिकेला नोटीस

By admin | Updated: September 29, 2016 02:17 IST

गणेशपेठ येथील आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पाची महानगरपालिका अडवणूक करीत आहे

हायकोर्ट : एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश
नागपूर : गणेशपेठ येथील आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पाची महानगरपालिका अडवणूक करीत आहे असा गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आरोप असून यासंदर्भात कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मनपा आयुक्त व नगर रचना विभागाचे सहायक संचालक यांना नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
मनपाला १२ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रकल्पाचा सुधारित ले-आऊट व इमारत आराखडा सादर करण्यात आला आहे. यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करूनही मनपाने आराखड्याला मंजुरी दिलेली नाही. यासंदर्भात मनपाला वेळोवेळी निवेदनेही सादर करण्यात आली आहेत असे कंपनीचे म्हणणे आहे.
याचिकेतील माहितीनुसार, २००८ मध्ये कंपनीने नॅशनल टेक्सटाईल कार्पोरेशनकडून गणेशपेठ येथील २८.९६ एकर जमीन लिलावात खरेदी केली. यानंतर कंपनीने मनपाकडे प्रायोगिक ले-आऊट आराखडा मंजुरीसाठी सादर केला. या जमिनीच्या वापरामध्ये औद्योगिकवरून व्यावसायिक असा बदल करायचा होता. २५ टक्के जमीन विविध सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मनपाने १ सप्टेंबर २००९ रोजी डिमांड नोट पाठविली. त्यानुसार कंपनीने २४ सप्टेंबर २००९ रोजी संबंधित रक्कम जमा केली. मनपाने ३ आॅक्टोबर २०१० रोजी प्रायोगिक ले-आऊट आराखड्याला मंजुरी दिली. यामुळे कंपनीने १८ नोव्हेंबर २००९ रोजी मनपाला पत्र लिहून आराखड्याला कायमस्वरुपी मंजुरी देण्याची विनंती केली. २० जुलै २००७ रोजीच्या नगर विकास अधिसूचनेनुसार कंपनीने औद्योगिक जमिनीचा वापर व्यावसायिक करण्यासाठी ५ मार्च २०१० रोजी मनपासोबत करार केला. सुविधांसाठी राखीव जागा मनपाला हस्तांतरित केली. दरम्यान, मनपाने १ लाख १७ हजार २५७ चौरस मीटरच्या ले-आऊटला मंजुरी दिली. यानंतर मनपाने १८ मार्च २०१० रोजी बिल्डिंग परमिटसाठी ३ कोटी ५१ लाख ९८ हजार ९१३ रुपयांची डिमांड नोट पाठविली. कंपनीने ३ मे २०१० रोजी ही रक्कम जमा केली. यानंतर कंपनीने ६ मे २०१० रोजी बिल्डिंग परमिट व कॉमेन्समेंट सर्टिफिकेट देण्याची विनंती केली. २८ मे २०१० रोजी मपनाने इमारत आराखडा मंजूर केला व कॉमेन्समेंट सर्टिफिकेटही जारी केले. सप्टेंबर-२०११ मध्ये गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चरने प्रकल्पातील ९ टॉवर बांधण्यासाठी गोदरेज प्रॉपर्टी कंपनीसोबत करार केला. यासाठी गोदरेज आनंदम ही नवीन कंपनी तयार करण्यात आली. दरम्यान, विविध घडामोडीनंतर गोल्डब्रिक्स कंपनीने सुधारित ले-आऊट व इमारत आराखडा सादर केला. परंतु, याला अद्यापही अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. श्याम देवानी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)