शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण नाही, शाळा महत्त्वाची

By admin | Updated: May 18, 2016 03:21 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याची(आरटीई)अंमलबजावणी केली.

आरटीईची सोडत : ५९५ शाळांसाठी १३,६४० अर्जनागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याची(आरटीई)अंमलबजावणी केली. परंतु त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागले आहे. अनेक मध्यमवर्गीय आरटीईच्या प्रक्रियेत सहभागी होऊन लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पालकांनी शिक्षणापेक्षा काही नामांकित शाळांनाच महत्त्व दिले आहे. काहीच शाळांना पालकांनी पसंती दर्शविली आहे. एका-एका शाळेसाठी हजारो अर्ज आले आहेत. आरटीईच्या लॉटरीची सोडत मंगळवारी बी.आर.ए. मुंडले शाळेत पार पडली. यात पालकांनी शिक्षणाला नाही, शाळेला महत्त्व दिल्याचे उघडकीस आले. नागपूर जिल्ह्यातील ५९५ शाळांतील ७,४१० जागेसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत १३,६४० पालकांनी आॅनलाईन अर्ज केले. मंगळवारी आरटीईची लॉटरी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या हस्ते काढण्यात आली. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, शिक्षण अधिकारी (प्रा.) दीपेंद्र लोखंडे, उपशिक्षण अधिकारी अनिल कोल्हे, आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ, अर्चना भोयर आदी उपस्थित होते. सोडतीत शून्य ते नऊ अंक चिमुकल्यांद्वारे निवडण्यात आले. असे ४० अंक निवडण्यात आले. प्रथम अंक नागो गाणार यांनी काढला. पुढची प्रक्रिया राष्ट्रीय सूचना केंद्र पुणे यांच्यामार्फत शाळानिहाय विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. (प्रतिनिधी)