शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

डिमांडच नाही, कसा मिळणार लाभ?

By admin | Updated: May 14, 2014 00:47 IST

महानगरपालिकेच्यावतीने वेळेवर कर भरणार्‍यांना मालमत्ता करातील सामान्य करावर ४ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मालमत्ता करात ४ टक्के सूट: ३१ मेच्या आधी कर भरणार्‍यांना मिळणार फायदा

नागपूर : महानगरपालिकेच्यावतीने वेळेवर कर भरणार्‍यांना मालमत्ता करातील सामान्य करावर ४ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे ही घोषणा पोकळच ठरली आहे. कारण, कर भरण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे आणि १२ मे पर्यंत डिमांड नोटच वाटण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दावा केला होता की जो मालमत्ताधारक आपला वर्तमान कर भरेल त्याला लगेचच डिमांड नोट दिली जाईल. परंतु असे झाले नाही. एलबीटीचा फटका बसल्यानंतर मनपा प्रशासनाची झोप उडाली आणि त्यांनी मालमत्ता करावर आपले लक्ष केंद्रित केले. तरी डिमांड नोट देण्याचे काम डिसेंबरच्या शेवटपर्यंंत चालतच होते. त्यामुळे मागच्या वर्षी नागरिकांना सूट मिळू शकली नाही आणि यंदाही तशीच परिस्थिती दिसत आहे. नियमानुसार, ३१ मेच्या आधी मालमत्ता कर भरले तर सामान्य करात ४ टक्के सूट मिळते. ३0 जूनच्या आधी कर भरणार्‍यांनाही २ टक्के सूट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नाही तर ३१ डिसेंबरपर्यंंत कर न भरल्यास दर महिन्याला २ टक्के दराने दंडाची वसुली करण्याचे प्रावधान यात करण्यात आले आहे. तरी डिमांड नोट पोहोचण्याच्या एक महिन्याच्या आत दंड वसूल करायचा नाही, असा निर्णय मनपा सभागृहात घेण्यात आला. मागच्या आर्थिक वर्षात ४१३ कोटी रुपयांचे डिमांड नोट जारी करण्यात आले होते. आधी अर्थसंकल्पात २२१ कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. वाटलेल्या डिमांडचा आकडा बघून हे लक्ष्य २५0 कोटी करण्यात आले. परंतु पूर्ण शक्ती वापरूनही केवळ १८९ कोटी रुपयांचीच वसुली करता आली. आता २१ ते २३ मे दरम्यान शहरात २३ ठिकाणी शिबिर आयोजित करून वसुलीचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)