शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

मनपाचे १५० कोटी कोषागारात पडून : बिकट आर्थिक परिस्थितीत मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:00 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कंत्राटदरांची थकबाकी, बस ऑपरेटर, खासगी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची जवळपास १५० ते २०० कोटींची देणी थकबाकी आहे. याचा शहरातील विकास कामांना फटका बसला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या विशेष अनुदानातील शिल्लक १५० कोटी जिल्हा कोषागार विभागात आले आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आठवड्यापूर्वी आलेली ही रक्कम कोषागारात पडून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून विशेष अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कंत्राटदरांची थकबाकी, बस ऑपरेटर, खासगी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची जवळपास १५० ते २०० कोटींची देणी थकबाकी आहे. याचा शहरातील विकास कामांना फटका बसला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या विशेष अनुदानातील शिल्लक १५० कोटी जिल्हा कोषागार विभागात आले आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आठवड्यापूर्वी आलेली ही रक्कम कोषागारात पडून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त आहे. उपराधानीच्या धर्तीवर शहराचा विकास व्हावा, यासाठी वर्ष १९९५-९६ सालापासून दरवर्षी १५ कोटींचे विशेष अनुदान देण्याला नगरविकास विभागाने गतकाळात मंजुरी दिली होती. परंतु कालांतराने या प्रस्तावाची उपेक्षा झाली. उपराजधानीला विशेष अनुदान मिळाले नाही. त्यातच जीएसटी लागू झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. याचा शहरातील विकास कामांना फटका बसला.गेल्या वर्षात महापालिका प्रशासनाने ३२५ कोटींच्या विशेष अनुदानाची थकीत रक्कम देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे अनुदान मंजूर करण्यात आले होते. दिवाळीपूर्वी यातील १५० कोटी उपलब्ध झाले होते. बिकट आर्थिक परिस्थितीत आर्थिक बळ मिळाल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला होता. कंत्राटदारांची थकबाकी देणे शक्य झाले होते. आता दुसºया टप्प्यात पुन्हा १५० कोटींचे विशेष अनुदान कोषागार विभागाकडे आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे महापालिकेला दर महिन्याला ५२ क ोटी जीएसटी अनुदान मिळत होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जीएसटी अनुदानाची रक्कम ८६ क ोटी करण्यात आली. यामुळे महापालिकेची आवश्यक खर्चाची चिंता कमी झाली आहे.रखडलेल्या कामांना गती मिळणारराज्य शासनाकडून विशेष अनुदानाचा दुसरा टप्पा प्राप्त झाल्याने रखडलेल्या विकास कामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शहरातील सिमेंट रोड, टंचाई निवारण, नाले सफाई, अंतर्गत रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे. तसेच कर्मचाºयांना यातून थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी