शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

एनआयटीच्या लाचखोर अभियंत्याला अटक

By admin | Updated: May 7, 2015 02:13 IST

जुने बांधकाम तोडण्याची परवानगी देण्यासाठी ३५ हजाराची लाच मागणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यासच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

नागपूर : जुने बांधकाम तोडण्याची परवानगी देण्यासाठी ३५ हजाराची लाच मागणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यासच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचखोर अभियंत्याचे नाव चंद्रकांत धरमदास नगराळे (४८) आहे. हनुमाननगर कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. तक्रारकर्ता गणपत बाराहाते यांच्या पत्नीच्या नावाने बिडीपेठ येथे प्लॉट आहे. या प्लॉटवर दोन रुमचे बांधकाम आहे. बाराहाते यांनी २००५ मध्ये प्लॉटच्या ‘आरएल’साठी व बांधकामाच्या नियमितीकरणासाठी हनुमाननगर झोन कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी कार्यालयातून जुने बांधकाम तोडल्यानंतरच नियमितीकरण होऊ शकते, अशी माहिती दिली. जुने बांधकाम अतिक्रमण असल्यामुळे ते तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यास सांगितले. बाराहाते यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये हुडकेश्वर पोलीस ठाण्यात बंदोबस्तासाठी अर्ज केला. बंदोबस्त शुल्कापोटी १५ हजार रुपये भरले. पोलीस पोहोचल्यानंतर एनआयटीच्या तोडूदस्त्याने येण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे १५ हजार रुपये बुडाले. त्यानंतर एनआयटीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून पुन्हा बंदोबस्तासाठी अर्ज केला. पैसे भरले, मात्र तोडूदस्ता आला नाही. २८ एप्रिलला बाराहाते यांनी हनुमाननगर झोनच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चंद्रकांत नगराळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे नव्याने अर्ज केला. दुसऱ्याच दिवशी नगराळे याने बाराहाते याला चर्चेसाठी बोलाविले. काम करून देण्यासाठी ३५ हजार मागितले. बाराहाते यांनी त्याला २० हजार दिले; उरलेली रक्कम चार-पाच दिवसात देण्याचे सांगितले. बाराहाते यांनी एनआयटी अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीनुसार बुधवारी बाराहाते हे नगराळे याच्याकडे गेले. नगराळे याने पैसे दिल्यानंतरच काम होईल, असे त्यांना सांगितले. दुपारी २ वाजता एसीबीचे निरीक्षक डब्ल्यू.एम. डाबरे आपल्या पथकासह एनआयटी कार्यालयात पोहोचले. नगराळेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यानंतर त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली, मात्र तिथे काही विशेष मिळाले नाही. (प्रतिनिधी)