शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी योजनेवर शस्त्रक्रियेची गरज

By admin | Updated: November 8, 2014 02:44 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाच हजार रुपये भरल्याशिवाय अ‍ॅन्जिओग्राफी होतच नाही.

सुमेध वाघमारे नागपूरशासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाच हजार रुपये भरल्याशिवाय अ‍ॅन्जिओग्राफी होतच नाही. हा नियम बीपीएलसह सर्वच रुग्णांसाठी आहे. विशेष म्हणजे, राज्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत’ या चाचणीचा समावेश असतानाही लाभार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहे. परिणामी अनेक रुग्ण पैशांअभावी अ‍ॅन्जिओग्राफीपासून दूर जात असून धोकादायक जीवन जगत आहे. पूर्वीसारखा हृदयाचा आजार आज श्रीमंतांचा राहिला नाही. तो सामान्य कामगार, गरिबांच्या घरातही दिसू लागला अहे. या आजाराच्या रुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली तर मोठे संकट कोसळल्याप्रमाणे त्या घराची स्थिती होते आणि प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरील उपचाराचे जास्त मोठे संकट असल्यासारखे वाटते. खाजगी इस्पितळातील लूट आणि शासकीय इस्पितळात नेल्यास पैशासोबतच रु ग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत आज गरीब वर्ग सापडला आहे. विशेष म्हणजे, अशा रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनाही कुचकामी ठरत आहे. रुग्णासह त्याचे कुटुंब आजारपणातील असुरक्षितता व मानिसक तणावातून जात आहे. संरक्षण असतानाही शुल्क भरण्याची अटरुग्णालयांमध्ये जीवनरक्षक उपकरणांची महत्त्वाची भूमिका असते, मात्र सुपर स्पेशालिटी आणि खासगी रुग्णालयांमध्ये काही वेगळचे चित्र आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ‘अ‍ॅन्जिओग्राफी’चा समावेश आहे. त्यानुसार लाभार्थ्यांची ही चाचणी नि:शुल्क व्हावी, असा नियम आहे. परंतु सुपर स्पेशालिटीसह योजनेतील सर्व खासगी इस्पितळांमध्ये जोपर्यंत शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत चाचणीच केली जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांकडे याच्या तक्रारी आहेत, परंतु अद्यापही उपाययोजना नसल्याने गरीब रुग्ण रडवेला झाला आहे. (प्रतिनिधी)