शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

वन व पर्यावरण कायद्यात बदलाची गरज

By admin | Updated: November 23, 2014 00:38 IST

भारतात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. परंतु वन व पर्यावरण कायद्यामुळे तिचा हवा तसा वापर करता येत नाही. अशा विकासाआड येणाऱ्या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे

हंसराज अहिर यांचे प्रतिपादन : व्हीएनआयटीमध्ये राष्ट्रीय संमेलननागपूर : भारतात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. परंतु वन व पर्यावरण कायद्यामुळे तिचा हवा तसा वापर करता येत नाही. अशा विकासाआड येणाऱ्या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शनिवारी के ले. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) मायनिंग विभाग आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने असेम्ब्ली हॉलमध्ये आयोजित ‘खनिज उद्योग व विकासातील आव्हाने’ यावरील द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे चेअरमन विश्राम जामदार होते. आमदार अनिल सोले, संयोजन समितीचे अध्यक्ष अनुप बिस्वास, मायनिंग विभागाचे प्रमुख टी.एल.मुथराज व प्रा. एम.एस. तिवारी आदी व्यासपीठावर होते. अहिर म्हणाले, वाढती लोकसंख्या व बेरोजगारी या देशापुढील गंभीर समस्या आहेत. यावर मात करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. यासाठी कृषीवर आधारित प्रक्रि या उद्योग उभे झाले पाहिजे. कृषीनंतर मायनिंग क्षेत्रातच रोजगारांच्या संधी आहेत. त्या उपलब्ध करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व संशोधनाची गरज आहे. परंतु वन तसेच पर्यावरण कायद्यामुळे विकासाला ब्रेक लागत असल्याने या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. कोळसा प्रामुख्याने वन विभागाच्या जमिनीत आढळतो. कोल इंडियाने स्वत:चे ब्लॉक खासगी कंपन्यांना देण्याचे धोरण स्वीकारले. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दुसरीकडे वन व पर्यावरण कायद्यामुळे कंपन्या उत्खनन करू शकत नाही. यातून मार्ग काढण्याची गरज आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांची रासायनिक खताची गरज आयात करून भागवली जाते. नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर झाला पाहिजे. यासाठी संशोधनाची गरज आहे. या संमेलनाच्या माध्यमातून देशात नवा संदेश जाईल. मायनिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढीला मदत होईल, असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला. देशातील नैसर्गिक धनसंपदेचा वापर विकासासाठी झाला पाहिजे. कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या माध्यमातून विकासाला चालना मिळेल. मायनिंग क्षेत्राला भविष्यात चांगले दिवस असल्याचा विश्वास विश्राम जामदार यांनी व्यक्त केला. अनिल सोले, टी.एल.मुथराज यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला देशभरातील विविध संस्थांचे तज्ज्ञ, प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)