राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद २१ ला

By Admin | Updated: September 13, 2014 02:39 IST2014-09-13T02:39:40+5:302014-09-13T02:39:40+5:30

देशात संविधानिक मूल्ये आणि रिपब्लिकन संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन विचार मंचतर्फे विदर्भ साहित्य संघ ...

National Republican Council on 21st | राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद २१ ला

राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद २१ ला

नागपूर : देशात संविधानिक मूल्ये आणि रिपब्लिकन संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन विचार मंचतर्फे विदर्भ साहित्य संघ सभागृह सांस्कृतिक संकुल झांशी राणी चौक येथे येत्या २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
संविधानाचे विश्लेषक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. एस.जी. बनसोड हे स्वागताध्यक्ष राहतील. प्रसिद्ध विचारवंत जेएनयू नवी दिल्ली येथील प्रोफेसर तुलसीराम जी. आणि इरफान अली इंजिनियर हे प्रमुख अतिथी राहतील. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक एस.आर. दारापुरी हे अध्यक्षस्थानी राहतील. यानंतर धर्मनिरपेक्ष प्रजातांत्रिक राजकारणात रिपब्लिकन विचारधाराच एकमात्र विकल्प’ याविषयावर बौद्ध साहित्यिक कंवल भारती मार्गदर्शन करतील. प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रणजित मेश्राम यांचे रिपब्लिकन संकल्पनेवर अभिभाषण होईल. डॉ. नंदलाल भारती आणि अ‍ॅड. दिवाकर सिंह हे सहभागी होतील. रिपब्लिकन विचार मंचचे मार्गदर्शक प्रा. डॉ. एन.व्ही. ढोके हे अध्यक्षस्थानी राहतील. (प्रतिनिधी)

Web Title: National Republican Council on 21st