शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमालाच शस्त्रक्रियेची गरज!

By admin | Updated: September 5, 2016 02:42 IST

कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये,

राज्यात लेन्स, चष्मे व औषधांचा तुटवडा : मोतीबिंदूच्या एक लाखाहून शस्त्रक्रिया कमी झाल्यातसुमेध वाघमारे नागपूर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी राज्यात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाला २०१० पासून विशेष सुरुवात झाली. सुरुवातीला नेत्रदीपक कामगिरी बजावलेल्या या कार्यक्रमाला गेल्या वर्षापासून सुविधांअभावी खीळ बसली आहे. लेन्स, चष्मे व औषधांचा तुटवडा पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोतिबिंदूच्या तब्बल एक लाख शस्त्रक्रिया कमी झाल्यात. परिणामी, आता या कार्यक्रमालाच शस्त्रक्रियेची गरज असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत २०२० पर्यंत अंधत्वाचे प्रमाण ०.३ टक्के इतके खाली आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. डोळ्यांबाबत उच्च दजार्ची सेवा उपलब्ध करून देणे, अंधाचे सर्वेक्षण करणे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करुन दृष्टिदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना चष्मा पुरवठा करणे आदींचा या कार्यक्रमात समावेश आहे. तसेच ११ व्या पंचवार्षिक योजनेनुसार डायबेटिक रेटिनोपॅथी, काचबिंदू व्यवस्थापन, बुब्बुळ प्रत्यारोपण, व्हिट्रोरेटायनल सर्जरी व बालपणातील अंधत्व यांचा आर्थिक मदतीसाठी समावेश करण्यात आला आहे. मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व रोखण्याला प्राधान्य देऊन २००९-१० पासून ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. वार्षिक ७ लाख २५ हजार मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. पहिल्या तीन वर्षे शंभर ते १०० टक्के उद्दिष्ट पार पाडण्यात आले, तर २०१३-१४ साली ८ लाख ९ हजार १२ शस्त्रक्रिया २०१४-१५ मध्ये ८ लाख ८ हजार ५३५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे, मात्र आता जी आकडेवारीमध्ये घसरण झाली ती धक्कादायकच आहे. २०१५-१६ मध्ये सात लाख सहा हजार १३८ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या. तब्बल १ लाख २ हजार ३९७ शस्त्रक्रिया कमी झाल्या. नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांचा जर विचार केला तर २०१४-१५ मध्ये २४, १६० शस्त्रक्रिया झाल्या तर २०१५-१६ मध्ये २०,५१० शस्त्रक्रिया झाल्या. ३,६५० शस्त्रक्रिया कमी झाल्या. या कार्यक्रमांतर्गत उपसंचालक आरोग्य विभागाला लेन्स, चष्मे व औषधांचा साठा मागणीच्या तुलनेत फारच कमी मिळाला. यामुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येते.