शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रने शहर खराब केले

By admin | Updated: November 8, 2015 02:54 IST

नासुप्रच्या माध्यमातून नागपूर शहराचा नियोजनबद्ध विकास झाला नाही. नासुप्रच्या काही अधिकाऱ्यांनी शहर खराब करण्याचे काम केले.

महापौर दटके यांचे मत : बरखास्तीच्या भूमिकेवर भाजप कायमनागपूर : नासुप्रच्या माध्यमातून नागपूर शहराचा नियोजनबद्ध विकास झाला नाही. नासुप्रच्या काही अधिकाऱ्यांनी शहर खराब करण्याचे काम केले. नासुप्र बरखास्त करण्याच्या भूमिकेवर भाजप आजही कायम आहे. राज्य सरकारही तेवढेच गंभीर आहे, असे मत महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे टिळक पत्रकार भवन येथे शनिवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके यांनी महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा मांडला. या वेळी नासुप्र बरखास्तीच्या भूमिकेबाबत विचारले असता दटके म्हणाले, सार्वजनिक उपयोगाठी ज्या जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या, त्यातील बहुतांश जागा नासुप्रने ताब्यातच घेतल्या नाहीत. जागा आरक्षित असतानाही डेव्हलपर्सने भूखंड पाडून त्या विकल्या. सामान्य नागरिकांनी त्या विकत घेतल्या. पुढे नासुप्रने गुंठेवारी कायद्यांतर्गत ते भूखंड नियमित केले. हे सर्व करताना नासुप्रचे नियोजन चुकले, असा ठपका त्यांनी ठेवला.नासुप्रकडे एक हजार कोटी रुपये जमा होते. हा मुद्दा आम्ही लावून धरला जनतेच्या कामासाठी नासुप्रचे २०० कोटी रुपये बाहेर काढले. यातील १०० कोटी रुपये सिमेंट रस्त्यासाठी नासुप्र देणार आहे तर १०० कोटी रुपये गुंठेवारी ले-आऊटच्या विकासावर खर्च केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या परिसराचा मेट्रोरिजन अंतर्गत विकास केला जाणार आहे. यासाठी एमएनआरडीची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर अंमलबजावणी होणार आहे. यानंतर नासुप्रला महापालिकेच्या हद्दीत काम करण्याचा अधिकार राहणार नाही. सर्व कामे महापालिकेमार्फत केली जातील व नासुप्रचा शहरातील अधिकार व हस्तक्षेप संपुष्टात येईल, असेही दटके यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)५५ ग्रीन बससाठी दोन दिवसात निविदा नागपूर शहरात नव्या ५५ ग्रीन बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस चालविण्यासाठी नवा आॅपरेटर नेमण्यात येणार आहे. यासाठी येत्या दोन दिवसात निविदा जारी केल्या जातील. याशिवाय स्टार बसचा जुना आॅपरेटर बदलून नवा आॅपरेटर नेमण्यासाठीही निविदा काढल्या जातील. तसेच ५५ ग्रीन बसमध्ये संचालनासाठी वेगळा आॅपरेटर व तिकीट काढून पैसे महापालिकडे जमा करण्यासाठी वेगळी एजन्सी नेमली जाईल. यासाठीही निविदा काढली जाणार असल्याचे दटके यांनी सांगितले.