नागपूरचे तापमान आले ४० अंशाखाली; किती दिवस पावसाचा अंदाज? हवामान विभागाने दिला इशारा

By निशांत वानखेडे | Updated: May 6, 2026 20:25 IST2026-05-06T20:25:05+5:302026-05-06T20:25:54+5:30

Nagpur : तब्बल २५ ते २८ दिवस उन्हाचे चटके व उष्णतेचा त्रास भाेगणाऱ्या नागपूरकरांना दाेन दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. बुधवारी तर शहराचे तापमान ४० अंशाच्या खाली आले व ३९.६ अंशाची नाेंद झाली.

Nagpur's temperature drops below 40 degrees; How many days of rain is expected? Meteorological Department warns | नागपूरचे तापमान आले ४० अंशाखाली; किती दिवस पावसाचा अंदाज? हवामान विभागाने दिला इशारा

Nagpur's temperature drops below 40 degrees; How many days of rain is expected? Meteorological Department warns

नागपूर : तब्बल २५ ते २८ दिवस उन्हाचे चटके व उष्णतेचा त्रास भाेगणाऱ्या नागपूरकरांना दाेन दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. बुधवारी तर शहराचे तापमान ४० अंशाच्या खाली आले व ३९.६ अंशाची नाेंद झाली. हवामान विभागाने २४ तासात वादळाचाही अंदाज वर्तवला आहे.

वेधशाळेने विदर्भासाठी वर्तवलेला अंदाज दाेन दिवस उशीरा खरा ठरला. मंगळवारी सकाळपासून पडलेले उन दुपार हाेता शांत झाले. आकाशात जमलेल्या ढगांनी सूर्याची तीव्रता कमी केली. पारा २.४ अंशाने खाली घसरला. बुधवारी त्यात पुन्हा १.२ अंशाची घसरण झाली व तापमान ३९.६ अंशावर घसरले, जे सरासरीपेक्षा २.८ अंशाने कमी आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता आणि उकाड्याचा त्रासही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. रात्रीच्या तापमानात आंशिक वाढ झाली असली तरी ते सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे दिवसासह रात्रीचा उकाडासुद्धा कमी झाला.

नागपूरसह गाेंदिया ३७.९, भंडारा ३८, गडचिराेली ३९ व यवतमाळचे तापमान ३९.२ अंश नाेंदविण्यात आले. अमरावती व अकाेल्याचेही तापमान कमी हाेती ४१ व ४२ अंशावर आले आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार उकाड्यापासून मिळालेला दिलासा २४ तास राहिल, मात्र त्यानंतर तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यात तापमान ३ ते ५ अंशाने वाढण्याचा अंदाज आहे.

Web Title : नागपुर का तापमान 40 डिग्री से नीचे; बारिश का पूर्वानुमान!

Web Summary : नागपुर के निवासियों को गर्मी से राहत मिली, तापमान 40 डिग्री सेल्सियस से नीचे। मौसम विभाग ने 24 घंटों में तूफान का पूर्वानुमान लगाया है, लेकिन जल्द ही विदर्भ में तापमान 3-5 डिग्री सेल्सियस बढ़ने की उम्मीद है। राहत अस्थायी है।

Web Title : Nagpur Temperature Dips Below 40; Rain Forecast Issued!

Web Summary : Nagpur residents get respite from heat as temperature drops below 40°C. The weather department forecasts storms in 24 hours, but expects temperatures to rise 3-5°C in Vidarbha soon. Relief is temporary.