शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

४४ अंशांनी नागपूर होरपळले; उष्माघाताचे ३१ रुग्ण, शाळा-महाविद्यालयांना आज सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:09 IST

Nagpur : वाढत्या उन्हाने नागपूर अक्षरशः होरपळून निघत असून, शुक्रवारी तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या उन्हाने नागपूर अक्षरशः होरपळून निघत असून, शुक्रवारी तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनाने १८ एप्रिल रोजी सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेचा परिणाम आरोग्यावरही दिसून येत असून, शहरात आतापर्यंत उष्माघाताशी संबंधित ३१ रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान विभागाने १८ व १९ एप्रिलदरम्यान 'हीट वेव्ह'चा इशारा दिला असून, तापमान सामान्यपेक्षा ४ ते ५ अंशांनी जास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोरड्या वातावरणामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले असून, संपूर्ण प्रदेश उष्णतेच्या लाटेत सापडला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सुटीचा निर्णय

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत अधिकारांचा वापर करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शनिवारी सुटीचा निर्णय घेतला. प्रशासनाने पालकांना मुलांची विशेष काळजी घेण्याचे, त्यांना पुरेसे पाणी पाजण्याचे व हलके कपडे परिधान करण्याचे आवाहन केले आहे.

उष्माघातसदृश थकव्याचे सर्वाधिक रुग्ण

उष्णतेच्या वाढत्या तडाख्याचा परिणाम आरोग्यावरही दिसू लागला आहे. १ मार्च ते १६ एप्रिलदरम्यान नोंदवलेल्या ३१ रुग्णांमध्ये 'हीट एक्झॉशन' अर्थात उष्माघातासारख्या तीव्र थकव्याचे १३ रुग्ण आढळले. याशिवाय 'हीट रॅश' (घामोळे) चे १० आणि 'हीट क्रॅम्प्स'चे (स्नायूंमध्ये पेटके) ८ रुग्ण नोंदले गेले आहेत. ही आकडेवारी वाढत्या उष्णतेचा धोकादायक इशारा असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क

दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागाने परिस्थितीचा आढावा घेत 'हीट अॅक्शन प्लॅन' अंतर्गत विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णालयांमध्ये औषधे व आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले असून, आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसही उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

२० व २१ एप्रिलला ढगांची शक्यता

हवामान विभागाने २० व २१ एप्रिल रोजी आकाश ढगाळ राहण्यासोबतच विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, त्यापूर्वी दोन दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Scorches at 44 Degrees; Heatwave Sickens, Schools Closed

Web Summary : Nagpur hits 44°C, triggering heatwave alerts. Schools and colleges are closed on April 18th. 31 heatstroke cases reported, prompting health measures and public advisories to avoid midday sun and stay hydrated. Relief expected with possible clouds and light rain on April 20-21.
टॅग्स :nagpurनागपूरHeat Strokeउष्माघातTemperatureतापमानweatherहवामान अंदाज