शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातच भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन

By admin | Updated: May 20, 2016 02:51 IST

तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश नागपुरात कायमस्वरूपी स्थापित करण्यात आला आहे, होय याबाबत फारसा गाजावाजा झाला नसला तरी ही गोष्ट खरी आहे.

थायलंडकडून बुद्धाच्या अस्थिकलशाची अमूल्य भेट : कपिलवस्तू बुद्ध विहारात सात महिन्यांपूर्वीच स्थापित योगेंद्र शंभरकर नागपूरतथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश नागपुरात कायमस्वरूपी स्थापित करण्यात आला आहे, होय याबाबत फारसा गाजावाजा झाला नसला तरी ही गोष्ट खरी आहे. थायलंडच्या प्रिन्सेस शिरीकॉन यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरला ही अमूल्य भेट मिळाली असून सात महिन्यांपूर्वीच हा अस्थिकलश उत्तर नागपुरातील नारी रोडवरील कपिलवस्तू बुद्ध विहारामध्ये कायमस्वरूपी स्थापित करण्यात आला आहे. अस्थिकलशाचे दर्शन बुद्ध पौर्णिमेपासून सर्वांसाठी खुले होणार आहे. थायलंडचे भदंत अनेक हे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर त्यांच्या भिक्खू संघासोबत नेहमी येत असतात. भारत-थायलंड मैत्री संघाचे पदाधिकारी व सदस्य दिनेश पाटील यांच्या माध्यमातून थायलंडमधील दानदाते भारतातील बुद्ध विहारांना बुद्ध प्रतिमा भेट स्वरुपात देत असतात. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या मध्यस्तीने भदंत अनेक यांच्या माध्यमातून देशभरातील विहारांसह कपिलनगर येथील कपिलवस्तू विहाराने तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि बुद्धांच्या अस्थिकलशासाठी निवेदन केले होते. थायलंड संघ टेम्पल कमिटीने प्रिन्सेस शिरीकॉन यांच्या वाढदिवसानिमित्त जगातील काही शहरांसोबतच नागपुरातील कपिलवस्तू विहाराची बुद्ध प्रतिमा व अस्थिकलशासाठी निवड केली. गेल्यावर्षी २३ आॅक्टोबर २०१५ रोजी भदंत एन. बोधीरत्न नायकथेरो, भदंत प्रज्ञानंद (कपिलवस्तू बुद्ध विहार) आणि आमदार व नगरसेवकांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु तेव्हा तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. त्याच दिवशी भदंत अनेक, थायलंडच्याउपासिका दृताईरात जो, खुनोपाकॉन, थनार्कीत जो. खुनापोकॉनसह थायलंड व श्रीलंका येथील ४० भदंतांची चमू भगवान बुद्धाच्या अस्थिकलशासह नागपुरात आले होते. त्यांच्याच हस्ते बुद्ध प्रतिमा व अस्थिकलशाची स्थापना करण्यात आली होती. तरुणांनी जबाबदारी स्वीकारलीनागपूर : सोबतच सुरक्षा व्यवस्था करण्याची ताकीदही देण्यात आली होती. कपिलवस्तू बुद्ध विहार येथे सात महिन्यांपूर्वीच हा अस्थिकलश स्थापित झाला. बुद्ध विहार समितीला भाग्य लाभले होते. परंतु ते याच्या सुरक्षेसंदर्भात चिंतेतही होते. त्यामुळेच या जागतिक वारसा असलेल्या अस्थिकलशाबाबत फारसा गाजावाजा करण्यात आला नाही. समितीची मंडळी अगोदर सुरक्षेबाबत आपल्याच स्तरावर निश्चिंत होऊ पहात होते. त्यानंतर समिती व परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही स्क्रिनसह काही आवश्यक संसाधनांची व्यवस्था केली. तसेच समता सैनिक दल आणि भीम बॉईज संस्थेच्या तरुणांनी आळीपाळीने बुद्ध विहाराच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली. तसेच पोलिसांनाही सूचना देण्यात आली. याप्रकारे सुरक्षेची व्यवस्था झाल्याने तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश सामान्य नागरिकांसाठी बुद्ध पौर्णिमेपासून खुला करण्याचा समितीचा मानस आहे. याची सुरुवात २० मे पासून महापरित्राणपाठ व सुत्तपठणाने केली होईल.(प्रतिनिधी)