शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:06 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, अनिल किलोर, विरेंद्रसिंग बिष्ट, मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांच्यामुळे ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, अनिल किलोर, विरेंद्रसिंग बिष्ट, मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांच्यामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपुरात जडणघडण झालेल्या या पाचही अतिरिक्त न्यायमूर्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे सेवेत कायम करण्यात आले आहे.

नागपुरातील विधिज्ञ त्यांच्या सखोल विधी ज्ञानाकरिता संपूर्ण देशात ओळखले जातात. आतापर्यंत अनेक विधिज्ञांनी विविध मोठमोठ्या पदांवर कार्य करून नागपूरचा मान सतत उंचावत नेला. त्यात सदर पाच विधिज्ञांचाही समावेश आहे. न्या. घरोटे व न्या. किलोर यांची २३ ऑगस्ट २०१९ तर, न्या. बिष्ट, न्या. जवळकर व न्या. बोरकर यांची ५ डिसेंबर २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सेवेत कायम करण्यात आले आहे. यासंदर्भात २७ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हे पाचही विधिज्ञ येत्या १ जून रोजी कायम न्यायमूर्ती म्हणून शपथ घेणार आहेत.

न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी घरोटे यांनी ३३, तर किलोर यांनी २७ वर्षे नागपूरमध्ये वकिली केली. घरोटे यांनी वडील गुणवंतराव यांच्या, तर किलोर यांनी अ‍ॅड. अरविंद बडे व अ‍ॅड. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. घरोटे नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे सचिव होते. किलोर हे हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी लढताना विविध ज्वलंत विषयावर जनहित याचिका दाखल केल्या होत्या.

बिष्ट, जवळकर व बोरकर यांनीही नागपूरमध्ये अनेक वर्षे वकिली केली. त्यानंतर तिघेही न्यायिक अधिकारी झाले. बिष्ट हे सुरुवातीला कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी होते. त्यानंतर ते एकेक पायरी वर चढत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. जवळकर यांची २००८ मध्ये जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी विविध न्यायालयांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. त्या हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या सदस्य व विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्या सचिव होत्या. बोरकर यांनी न्यायिक अधिकारी झाल्यानंतर विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्य केले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश होते.