शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात ९९ टक्के पंचनामे पूर्ण : १, ७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:37 IST

शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देशासनाला पाठवायचा आहे १५ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. शासनाला नुकसानीचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी यासह फळ पिकांनाही मोठा फटका बसला. कापसाची बोंड गळून पडली. कापलेली सोयाबीन काळवंडली. संत्रा आणि मोसंबी गळून पडली. यावर्षी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे बराच काळ पेरण्या खोळंबल्या होत्या. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता. आता पीक कापणीला आले असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची थट्टाच केली. काळजीवाहू सरकार शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचले. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आंदोलन झाली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू झाले. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यासह इतर पाचही जिल्ह्याचे पंचनामे १०० टक्के आटोपले आहे. बुधवारी प्रशासनाकडे आलेल्या अहवालानुसार १,७५,३७७.२१ हेक्टर क्षेत्रफळाचे पंचनामे पूर्ण झाले आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकºयांची संख्या ३,२०,४१९ इतकी आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर