नागपूरच्या व्यापाऱ्याची उमरेडच्या लाॅजमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:10 IST2021-08-15T04:10:09+5:302021-08-15T04:10:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शहरातील इतवारी मुख्य मार्गालगत असलेल्या वरुण लॉज येथील खोली क्रमांक ३१ मध्ये नागपूर येथील ...

Nagpur businessman commits suicide in Umred's lodge | नागपूरच्या व्यापाऱ्याची उमरेडच्या लाॅजमध्ये आत्महत्या

नागपूरच्या व्यापाऱ्याची उमरेडच्या लाॅजमध्ये आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : शहरातील इतवारी मुख्य मार्गालगत असलेल्या वरुण लॉज येथील खोली क्रमांक ३१ मध्ये नागपूर येथील एका व्यापाऱ्याने खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

अभिलाष सुनील पाटील (३१, रा. रामेश्वरी रोड, जोगीनगर, नागपूर) असे मृताचे नाव असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध उमरेड पोलीस घेत आहेत. अभिलाष पाटील हा अविवाहित होता. त्याचे नंदनवन पोलीस ठाणा परिसरात ऑटाेमाेबाईलचे दुकान होते, अशी माहिती मिळाली. अभिलाष हा शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वरुण लॉज येथे आला होता. त्याने आपल्या नावे एक खोली बुक केली. अशातच सकाळच्या सुमारास लॉजच्या खिडकीतून अचानकपणे खिडकीला गळफास लावून ताे लटकल्याचे चित्र दिसले. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. लॉजचे व्यवस्थापक राहुल गेडाम यांच्या तक्रारीवरून उमरेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. आर. पांडे करीत आहेत.

Web Title: Nagpur businessman commits suicide in Umred's lodge