शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकर रमले पंडितजींच्या संतूरवादनात

By admin | Updated: May 13, 2014 00:58 IST

पहाटेचा प्रहर होता, सूर्याची किरणे हळूहळू पृथ्वीवर पडायला लागली होती, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता,

नागपूर : पहाटेचा प्रहर होता, सूर्याची किरणे हळूहळू पृथ्वीवर पडायला लागली होती, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता, अशा वातावरणात पंडित भजन सोपारी यांनी आपल्या संतूराच्या तारा छेडल्या आणि यातून एक विलक्षण नाद प्रगट झाला. सिव्हिल लाईन परिसरात मॉर्निंंग वॉक करणार्‍यांची पावले या नादाच्या शोधात दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या मुक्तांगणमध्ये पोहोचली आणि पंडितजींच्या संतूरवादनात अक्षरश: रमली.

नागपूरकरांना पहाटे पहाटे सुमधूर संगीताचा अनुभव द.म.क्षेत्र सांस्कृतिक केंद्रामुळे मिळाला. केंद्रातर्फे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी ‘नादब्रह्म’ प्रात:कालीन संगीत सभेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच रविवारी सुविख्यात संतूर वादक पद्मश्री पं. भजन सोपोरी यांच्या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी पहाट व पाडवा पहाट वगळता नागपुरात अशाप्रकारच्या प्रात:कालीन संगीत सभेचे आयोजन प्रथमच करण्यात आले होते. नियमित सांध्यकालीन संगीत सभेचा आस्वाद घेणार्‍या रसिकांना ही अनोखी भेट होती. राग अहिरीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संतुराच्या मधुर स्वरांचा नादच इतका प्रफुल्लित करणारा होता की, रसिक शांतचित्ताने संतूराच्या नादात तल्लीन झाले होते. पंडितजींच्या प्रत्येक तोडीला रसिकांकडून भरभरून टाळ्या मिळत होत्या. राग भैरवीने त्यांनी कार्यक्रमाचे समापन केले. त्यांना तबल्यावर मिथिलेश झा व संतूरवर विथिका टिकू यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. कार्यक्रमाला वेस्टर्न कोल फील्डचे मुख्य प्रबंधक दिनेशचंद्र गर्ग, वनामतीच्या संचालिका विनीता सिंगल, केंद्र निदेशक डॉ. पीयूष कुमार, स्मिता राव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्‍वेता सेलगावकर यांनी केले. (प्रतिनिधी)