शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सांप्रदायिक शक्तीचा मूक निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 02:55 IST

राज्यघटनेने निर्माण केलेल्या समता, बंधूता व एकतेच्या वातावरणात विष मिसळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ....

गांधीवादी कार्यकर्ते एकत्र : संविधान चौकात केले आंदोलननागपूर : राज्यघटनेने निर्माण केलेल्या समता, बंधूता व एकतेच्या वातावरणात विष मिसळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सांप्रदायिक व हुकूमशाही शक्तीचा निषेध करण्यासाठी गांधीवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी संविधान चौकात मूक धरणे आंदोलन केले. आंदोलनात सुमारे १०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात माजी खासदार विलास मुत्तेमवार, लीलाताई चितळे, हरिभाऊ केदार, उमेशबाबू चौबे, केशवराव शेंडे, डॉ. चित्रा सूर, डॉ. रतिनाथ मिश्रा, जम्मू आनंद, मा.म. गडकरी, यादवराव देवगडे, दत्तात्रय बर्गी, धनंजय धार्मिक, रवी गुडधे, आत्माराम उखळकर, बाबूराव झाडे, डॉ. प्रकाश तोवर, डॉ. सुनिती देव, अ‍ॅड. रेखा बारहाते, धर्मेंद्र राजपूत, अमिताभ पावडे, सत्यनारायण शर्मा, अनंतराव अहमदाबादकर आदींचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांनी सुमारे दोन तास काहीही न बोलता शांततेच्या मार्गाने सांप्रदायिक व हुकूमशाही शक्तीचा निषेध केला. वैष्णव जन तो... या भजनाने आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन पूर्वनियोजित असल्यामुळे संविधान चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनाला स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, महात्मा गांधी विचार मंच, जागृत नागरिक मंच यासह अन्य गांधीवादी संस्था व संघटनांचा पाठिंबा होता. संविधान चौकात पत्रके वाटून आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश कसा राहावा यासाठी तत्कालीन नेत्यांनी राष्ट्रीयस्तरावर चिंतन केले. त्यातून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याद्वारे देशात सामाजिक न्याय, समता, बंधूता व एकता ही मूल्ये रुजली. धार्मिक, जातीय व प्रादेशिक विविधता असूनही देश संघटित राहिला. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून देशाची अखंडता भंग होण्याच्या मार्गावर आहे. समाजात विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकासाच्या नावावर सत्ता मिळविणारे राजकारणी धर्मांध शक्तीला पाठिंबा देत आहे. या विध्वंसक परिस्थितीमुळे देशातील नागरिक व्यथित झाले आहेत. परिणामी हे मूक आंदोलन करण्यात आले.(प्रतिनिधी)