पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 07:55 AM2021-01-19T07:55:50+5:302021-01-19T07:57:54+5:30

मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या घरी आला होता.

Murder of a man trying to rapeon married girl | पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाची हत्या

पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाची हत्या

Next

नागपूर : दारूच्या नशेत पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाला मुलीच्या दिराने मारहाण करून त्याची हत्या केली. पिपळा हुडकेश्वर भागात रविवारी रात्री ही घटना घडली. हरिलाल मोहनलाल गोस्वामी (५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी नितीन नत्थुलाल सोळंकी आणि राजू हरिलाल राठोड यांना ताब्यात घेतले.

मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या घरी आला होता. काचेच्या वस्तू बनवून तो विकायचा. हा व्यवसाय चांगला चालत असल्याने तो मुलीच्याच घरी राहू लागला. मात्र, छोट्याशा घरात अडचण होत असल्याने १५ दिवसांपूर्वी त्याला सुमनच्या कुटुंबीयांनी हुसकावून लावले. त्यामुळे बाजूच्याच एका पडक्या शेडमध्ये तो राहू लागला. तो सुमनलाही तेथे नेत होता. वडील असल्याने सुमनच्या कुटुंबीयांना संशय घेण्याचे कारण नव्हते. रविवारी वहिनी आणि तिच्या वडिलांना डबा देण्यासाठी सुमनचा दीर नितीन सोळंकी त्याचा मित्र राजू रविवारी रात्री शेडमध्ये आले असता त्यांना हा प्रकार पाहावयास मिळाला. 

यावेळी दारूच्या नशेत टुन्न असलेला हरिलाल सुमनवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसला. ती विरोध करीत असल्याचेही नितीनने बघितले. दोघांनी हरिलालची धुलाई सुरू केली. मारहाणीत तो जमिनीवर पडला. खाली दगड असल्याने हरिलालचे डोके ठेचले गेले. तो निपचित पडल्याचे पाहून नितीन आणि राजू निघून गेले. सोमवारी सकाळी हरिलालचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले.

Web Title: Murder of a man trying to rapeon married girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.