शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे छिंदवाड्यात अडकली आई : मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 22:02 IST

मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली.

ठळक मुद्देनागपुरात मुलीशी संपर्क होत नसल्याने वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली. या अघटित प्रसंगामुळे आई आणि मुलीचा संपर्क तुटला. आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही या चिंतेमुळे कौटुंबिक कारणासाठी छिंदवाड्याला गेलेली आई भयक्रांत झाली असून मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो फोडत आहे.कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. ही परिस्थिती नियंत्रित ठेवून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता ही संचारबंदी अत्यावश्यक असली तरी यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. जे घरात आहेत ते घरात आणि जे बाहेर आहेत ते बाहेरच अडकले आहेत आणि याची एकेक उदाहरणे समोर येत आहेत. या लॉकडाऊनमुळे आईमुलीची ताटातूट होण्याचा भीषण प्रसंग पिटेसूर, गोरेवाडा येथील कहार कुटुंबावर ओढवला आहे. राजेश कहार व त्यांची पत्नी सुनंदा कहार हे मूळचे छिंदवाडा येथील रहिवासी असून कामाच्या शोधात नागपूरला आलेले हे कुटुंब गोरेवाडाजवळ पिटेसूरच्या हनुमान मंदिराजवळ राहत आहे. त्यांच्यासोबत त्यांची १३ वर्षीय मुलगी कशिश ही सुद्धा राहते. मिळालेल्या माहितीनुसार छिंदवाडा येथील एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ६ मार्च रोजी आईवडील छिंदवाड्याला निघाले. सुनंदा यांचा भाऊ जवळच राहतो. मुलीची परीक्षा सुरू असल्याने भावाच्या आसऱ्याने तिला येथेच सोडून ते गावाकडे निघाले. निधनाचे सोपस्कर आटोपून लवकर परत येऊ असा त्यांचा विचार होता. मात्र याच काळात कोरोना विषाणूचे संकट आपल्याही देशावर ओढवले. या संकटाला थोपविण्यासाठी आधी विविध राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मध्य प्रदेशही त्यातील एक. त्यानंतर महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आणि आता तर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.यामुळे जे जिथे आहेत तेथेच अडकले. सुनंदा आणि राजेश कहार हे सुद्धा सध्या छिंदवाड्यात अडकले आहेत. सुरुवातीला काही दिवस मुलीशी संपर्क होत होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून मुलीशी संपर्कच होत नसल्याने त्यांची चिंता वाढायला लागली. शेजाऱ्यांशीही संपर्क होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही, या विचाराने छिंदवाड्यात अडकलेले हे कुटुंब भयक्रांत झाले असून मुलीची परिस्थिती जाणण्यासाठी आईने टाहो फोडला आहे. आपल्या मुलीला मानेवाडा येथे राहणाऱ्या तिच्या आजीकडे सुखरूप सोडावे, अशी याचना तिची आई करीत आहे. पोलिसांपर्यंत त्यांची विनंती पोहचावी म्हणून ती धडपड करीत आहे.गृहमंत्र्यांनी लगेच पोलिसांना दिल्या सूचनादरम्यान आईचा हा टाहो गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचला. या माहितीची लगेच दखल घेत मुलीला मदत पोहचविण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. आईच्या सांगण्यानुसार मुलीला तिच्या मानेवाडा येथे राहणाऱ्या आजीपर्यंत पोहचविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर