शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मुलासाठी आई मागते भीक

By admin | Updated: April 4, 2017 01:48 IST

पोटासाठी भाकर शोधण्यासाठी शहरात येत असतानाच सुनीलचा अपघात झाला आणि मांडीपासून पाय गमवून बसला.

उपचाराचा खर्च डोईवर मेयोने हाकलले तर मेडिकलने दिली तारीख गरिबाने जायचे कुठे ?नागपूर : पोटासाठी भाकर शोधण्यासाठी शहरात येत असतानाच सुनीलचा अपघात झाला आणि मांडीपासून पाय गमवून बसला. मेयो सरकारी रुग्णालय असलेतरी उपचारात हातचे होते नव्हते ते सर्व खर्च झाले. कापलेल्या पायाची जखम भरण्यासाठी मेयोने मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागात पाठविले, परंतु येथे उपचार नव्हे मिळाली ती तारीख. पुन्हा तो मेयोत आला. मात्र येथील डॉक्टरांनी हाकलून लावले. तीन दिवसांपासून सुनील, त्याची पत्नी आणि आई उघड्यावर दिवस काढत आहे. जखमेवर बँडेज बांधण्यासाठीही या कुटुंबाकडे पैसे नसल्याने सुनीलची आई भिक मागून उपचार करीत आहे.काटोलच्या समोर असलेल्या भोरगड गावात सुनील भीमराव सय्याम राहतो. गावात हाताला काम नाही. जगण्याचे साधन नाही. यामुळे शहरात येऊन मजुरी करून पोटाची भूक भागवू या विचाराने तो त्याची आई निर्मलाबाई व पत्नी सोनूसोबत रेल्वेतून नागपूरकडे निघाला. ३ मार्च रोजी मोतीबाग रेल्वेस्टेशनवर आला असताना कुणीतरी मागून धक्का दिला. सुनील रेल्वेतून खाली पडला. यात त्याचा डाव पायच गुडघ्यापासून कापला गेला. रेल्वे पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले. गँगरीन होऊ नये म्हणून मांडीपर्यंत पाय कापला. तीन आठवड्यानंतर मेयोने जखमेवर त्वचा लावण्यासाठी मेडिकलच्या प्लॅस्टिक सर्जरीच्या विभागात जाण्यास सांगितले. परंतु या विभागाने दोन दिवसानंतर येण्यास सांगितले. कुठे जावे, म्हणून सय्याम कुटुंबाने उघड्यावर दिवस काढले. दोन दिवसानंतर पुन्हा या विभागात गेल्यावर त्यांना १५ दिवसांची तारखी दिली. जखम ओली असल्याने त्यावरील उपचारासाठी पुन्हा ते मेयोत आले, तर येथील एका डॉक्टरने वारंवार येथे येऊ नका म्हणून हाकलून लावले. महिन्याभराच्या उपचारात या कुटुंबाचे पैसे संपले. जखमेवर बँडेज बांधण्यासाठीही या कुटुंबाकडे पैसे नव्हते. शेवटी सुनीलच्या आईने हिंमत करून मोमीनपुऱ्यात जाऊन भिक मागितली. त्यात मिळालेल्या पैशातून बँडेज आणि खायला विकत आणले. गेल्या चार दिवसांपासून हे कुटुंब असेच जगत आहे. परंतु कुणाचेच लक्ष नाही. त्यांना बोलते केल्यावर सुनीलची आई निर्मलाबाई रडत म्हणाल्या, उद्या भिकमध्ये चारशे-पाचशे रुपये मिळाले की गावाला जाईन, पण येथे नाही राहीन, असे म्हणून त्यांनी पुढील बोलणे टाळले. (प्रतिनिधी)कुणी आहे का दाता ?मेयो, मेडिकल उपचार करीत नाही, आणि गावाकडे जायला पैसे नाहीत. यामुळे गेल्या चार दिवसांपासून मेयोच्या परिसरात सय्याम कुटुंब उघड्यावर पडले आहे. भीक मागून कसेतरी पोटाची खळगी भरत आहे. यातच आठवड्यातून दोन वेळा सुनीलच्या पायावर मलमपट्टी करण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. याचा एकावेळचा खर्च हा १०० रुपयांच्या घरात आहे. कर्ता व्यक्तीच अंपग झाल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे. या कुटुंबाला समाजाच्या मदतीची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा जगण्याची उभारी व लढण्याचे बळ देऊ शकते.