शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी परिचारिकांच्या सेवेला दु:खाची झालरच अधिक

By admin | Updated: May 12, 2014 01:03 IST

रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणार्‍या विशेषत: खासगी इस्पितळांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे.

नागपूर : रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणार्‍या विशेषत: खासगी इस्पितळांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अजूनही किमान वेतन कायदा लागू नसल्यानं तुटपुंज्या पगारात परिचारिकांना काम करावे लागत आहे. येथे कायद्याचं संरक्षण नाही. नोंदणीकृत अर्हता नसल्याने त्यांना इतरांप्रमाणे मानसन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कंपाऊंडर, कधी कधी रुग्णांकडूनही शारीरिक, मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. एकूणच रुग्णसेवेला सुखापेक्षा दु:खाची झालर अधिक असल्याचे चित्र उपराजधानीतील आहे. १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन दरवर्षी साजरा केला जातो. परंतु आजही खासगी परिचारिकांच्या समस्यांकडे कुणी लक्ष देत नाही. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरक्षित उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे, स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणार्‍या रु ग्णाची शुश्रुषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. बदलत्या काळानुसार खासगी इस्पितळांमधील परिचारिकांना भेडसावणार्‍या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. शहरात २०० वर मोठे इस्पितळ आहेत. यात साधारण १२०० परिचारिका कामाला आहेत. परंतु यातील बहुसंख्य परिचारिका किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात काम करीत आहे. कायद्याचे संरक्षण नसल्याने अपमानांचे डोंगरच घेऊन त्या जगत आहेत. ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसुती, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जात आहे. तरीही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत आहे. (प्रतिनिधी)