शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच निर्वाचित १३० सदस्यांसाठी ‘आमदार निवास’ आकर्षण

By admin | Updated: November 21, 2014 00:49 IST

राज्य विधानसभेच्या निवडणुकीत १३० आमदार प्रथमच विधानसभेवर निर्वाचित झाले असून ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमधील आमदार निवासात प्रथमच ‘आमदार’ म्हणून थांबतील.

नागपूर : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत १३० आमदार प्रथमच विधानसभेवर निर्वाचित झाले असून ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमधील आमदार निवासात प्रथमच ‘आमदार’ म्हणून थांबतील. दरवर्षी नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत राज्यातील सत्तांतरानंतर होणारे हिवाळी अधिवेशन सर्वार्थाने वेगळे आहे. जुन्या आणि नवीन सदस्यांचा अनोखा मेळ या अधिवेशनाच्या निमित्ताने पाहायला मिळेल. १३० नवीन सदस्यांसह १५ वर्षांपासून आमदार म्हणून अधिवेशनात हजेरी राहणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री म्हणून नवीनच आहेत. अध्यक्ष, मंत्री यांच्यासह विरोधी पक्ष नेतेही या अधिवेशनात नवीनच असणार आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत विशेष अधिवेशन झाले. पण त्यात इतर कामकाज झाले नव्हते. त्यामुळे खरे अधिवेशन हेच ठरणार आहे. नवीन निर्वाचित झालेल्या सदस्यांना विधिमंडळाच्या कामकाजासोबतच आमदार निवास, विधानभवन आणि परिसराबाबतही उत्सुकता आहे.अधिवेशनासाठी आलेल्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था आमदार निवासात केली जाते. यावेळी १३० नवे चेहरे आमदार म्हणून तेथे असतील. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर १२ पैकी पाच आमदार प्रथमच निर्वाचित झाले आहेत. त्यात सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) डॉ. मिलिंद माने (उत्तर नागपूर), समीर मेघे (हिंगणा),डी.एम. रेड्डी (रामटेक) आणि आशिष देशमुख (काटोल) यांचा समावेश आहे. प्रत्येक आमदारांसाठी आमदार निवासात सर्व सुविधा युक्त स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली जाते. अनेक जण आमदार निवासात न थांबता इतरत्र थांबतात. मात्र त्यांच्या खोलीत कार्यकर्ते व त्यांचा कर्मचारी वर्ग मुक्कामाला असतो.दरम्यान ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी आमदार निवास सज्ज ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षा व्यवस्थेपासून तर विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छता यावर भर दिला जात आहे. देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असून रंगरंगोटीही केली जात आहे. सध्या अधिवेशन सुुरू होण्यास दोन आठवड्याचा अवधी आहे. शिल्लक काम या काळात पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)