शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन-१२५’ला ‘नाराजी’चे आव्हान

By admin | Updated: January 11, 2017 02:45 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘मिशन-१२५’ हा संकल्प घेऊनच तयारी करण्यात येत आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची ‘मॅरेथॉन’ यादी : प्रस्थापितांविरोधात कार्यकर्त्यांची दावेदारी योगेश पांडे   नागपूर आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘मिशन-१२५’ हा संकल्प घेऊनच तयारी करण्यात येत आहे. इच्छुकांच्या संख्येनेदेखील विक्रम केला आहे. मात्र काही प्रभागांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रस्थापित नगरसेवकांविरोधात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे केवळ नाव नको तर काम लक्षात घेऊन तिकीट देण्यात यावे, अशी कार्यकर्त्यांतून दबक्या आवाजात मागणी होत आहे. तिकीटवाटपानंतर कार्यकर्त्यांनी ‘नाराजी’चे अस्त्र उगारू नये यासाठी पक्षातील धुरीण विशेष प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या भाजपाच्या तिकिटासाठी पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. यंदा ३ हजार १० जणांनी तिकिटासाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. खासदार, आमदार व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारांची चाळणी सुरू आहे. प्रत्येक वेळी तिकिटांसाठी आजी-माजी नगरसेवकांसोबतच कार्यकर्तेदेखील इच्छुक असतातच. त्यामुळेच तिकीट मिळणार नाही, हे माहिती असूनदेखील ते अर्ज करतात. तिकीट वाटप जाहीर झाल्यावर सर्व पक्षासाठीच प्रचार करतात. मात्र यंदा शहरातील काही प्रभागात प्रस्थापितांविरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळेच प्रभागात चांगले नाव असलेल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीदेखील गंभीरतेने तिकिटांसाठी दावेदारी केली आहे. अशा स्थितीत तिकीटवाटपानंतर अपेक्षितांना उमेदवारी मिळाली नाही, तर कार्यकर्ते नाराज होऊ शकतात व याचा फटका प्रचाराला बसू शकतो, ही बाब पक्षाचे नेते जाणून आहेत. त्यामुळेच तिकीट कुणालाही मिळाले तरी पक्षहिताला प्राधान्य देण्यात यावे असे, मुलाखतींना येणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. जिंकणार कोण, सर्वेक्षण की शिफारस? पक्षाचे अंतर्गत राजकारण लक्षात घेता अनेकांना शहरातील मोठ्या नेत्यांनी तुम्हालाच उमेदवारी मिळेल असे तोंडी आश्वासन दिले आहे. अनेक इच्छुक तसा दावादेखील करीत आहेत. दुसरीकडे पक्षातर्फे सर्व प्रभागांत सर्वेक्षणदेखील करण्यात आले होते. त्यात आघाडीवर नावे येणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे पक्षनेत्यांनी छातीठोकपणे सांगितले होते. त्यामुळे सर्वेक्षणाला झुकते माप मिळते की शिफारस बाजी मारते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ‘आॅल इज वेल’ असल्याचा पक्ष पदाधिकारी दावा करीत असले तरी अनेक मोठ्या प्रभागातील कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धुसफूस त्यांना माहित आहे. त्यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर ‘डॅमेज कंट्रोल’ची वेळ येऊ नये यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या उमेदवाराला सर्वांचाच पाठिंबा : कोहळे तिकिटासाठी दावे-प्रतिदावे करण्यात येतातच. यंदा तीन हजारांहून अधिक इच्छुकांतून उमेदवारांची निवड करायची आहे. एकाच प्रभागातून १० हून अधिक ज्येष्ठ व दिग्गज नावे असल्याचेदेखील दिसून येत आहे हे खरे आहे. मात्र व्यक्ती नव्हे तर आम्ही पक्षाला जास्त महत्त्व देतो व कार्यकर्त्यांचीदेखील हीच विचारसरणी आहे. विशेष म्हणजे आम्ही सर्व प्रभागात सर्व इच्छुकांना एकत्रितपणे घेऊन दोनदा जनसंपर्क केला आहे. त्यामुळे जर यदाकदाचित कुणी नाराज झालाच तर तो तिसऱ्यांदा पक्षाच्या विरोधात प्रचारास धजावणार नाही. तशी अशी आम्ही अगोदरच व्यवस्था केली आहे. त्यामुळे कुणी नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असा दावा शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केला.