शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:22 IST

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली.

ठळक मुद्देवाहनांची तोडफोड, गोंधळपरिसरात प्रचंड दहशत, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली. हे पाच ते सात गुंड तब्बल अर्धा तास दहशत पसरवत असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले होते.सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कमाल चौक परिसरात गुन्हेगारांच्या दोन गटाचा आधी वाद झाला. एकाची कार अडवून दुस-या गटाने मारहाण केल्यानंतर मारहाणीचा बदला घेण्यासाठी पाच ते सात गुंड यशोधरानगर परिसरात पोहचले. त्यांनी पंचवटीनगर, इंदिरानगर, धम्मदीपनगर, गुरुवारी बाजार परिसरात प्रचंड आरडाओरड आणि शिवीगाळ करीत ३० ते ४० गाड्यांची तोडफोड केली. गुंडांचे हे टोळके दारूच्या नशेत टून्न होते. त्यांचा अविर्भाव पाहून परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आले. हिम्मत करून काहींनी आरडाओरड केली. तर काहींनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांचा ताफा तिकडे धावला. दरम्यान, आरोपी पळून गेल्यानंतर या भागातील नागरिक एकत्र झाले. तोवर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येत यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात पोहचले. त्यांनी नागरिकांची कशीबशी समजूत काढून त्यांना परत पाठविले. पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींची शोधाशोध केली. शुक्रवारी दुपारपर्यंत चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची ‘चौकशी’ सुरू होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी