शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यक विकास महामंडळावर अवकळा

By admin | Updated: May 20, 2014 00:59 IST

अल्पसंख्यक समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळावर अवकळा आली आहे.

योजना रखडल्या : संचालक मंडळाचेही दुर्लक्ष

विलास गावंडे - यवतमाळ

अल्पसंख्यक समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळावर अवकळा आली आहे. या महामंडळाने जाहीर केलेल्या बोटावर मोजण्याइतक्याही योजना राबविल्या जात नाही. यातील सर्वात मोठा अडसर कर्मचार्‍यांची वाणवा हा आहे. गेली काही वर्षांपासून नेमक्या कर्मचार्‍यांवर या महामंडळाचा गाडा हाकला जात आहे. सन २००० साली स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळासाठी ४५ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. त्यातील ३० कंत्राटी होते. ११ महिन्यांची आॅर्डर त्यांना देण्यात आली. तीन वर्षे सेवा पूर्ण केली. या पदावर कायम करण्यात यावे यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र यावर निर्णय झाला नाही. तोकड्या कर्मचार्‍यांच्या भरवशावर महामंडळाने योजना जाहीर केल्या. परंतु त्या राबविण्यासाठीच परिपूर्ण यंत्रणा नाही. राज्यात या महामंडळाची ३४ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांचा कारभार सांभाळण्यासाठी केवळ ४५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आता एका अधिकार्‍याकडे तीन ते चार कार्यालयांचा कारभार सोपविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर २०० ते २५० किलोमीटर अंतर दूर असलेल्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही सर्व सर्कस करताना या अधिकार्‍यांना योजना राबविताना कमालीच्या अडचणी येत आहेत. जिल्हा व्यवस्थापक, सहायक, कनिष्ठ लिपिक अशी कार्यालयातील कर्मचार्‍यांची संख्या अपेक्षित असताना नाममात्र कर्मचारी नियुक्त करून अल्पसंख्यक समाजाचा ‘विकास’ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या महामंडळामार्फत शैक्षणिक कर्जाशिवाय थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा, प्रशिक्षण आदी योजना आणि उपक्रम राबविल्या जातात. परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज पुरविले जाते. परंतु योजनांची माहिती आणि तत्काळ कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने एकप्रकारे अल्पसंख्यकांच्या विकासाला ब्रेक लागत आहे.