शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात झोपेच्या गोळ्या देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 22:15 IST

एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने झोपेच्या गोळ्या खाऊ घालून महिला मजुराच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकाचे कृत्य : मुलीच्या आईने केली आरोपीला मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने झोपेच्या गोळ्या खाऊ घालून महिला मजुराच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या घटनेचा एका स्वयंसेवी संस्थेने आकस्मिक केलेल्या चौकशीत खुलासा झाला आहे. नंदनवन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आणि अल्पवयीन मुलीच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वाठोडाच्या स्वामीनारायण मंदिराजवळील रहिवासी अशोक जायसवाल (५०) आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.जायसवाल अनेक दिवसांपासून शहरात सक्रिय आहे. त्याची बांधकाम व्यवसायासह शाळाही आहे. काही काळापूर्वी तो समाजाचा अध्यक्षही होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मूळची सिवनीची रहिवासी आहे. तिचे वडील गावातच राहतात. ती आई आणि १५ वर्षाच्या बहिणीसोबत जायसवालच्या नंदनवन ठाण्यांतर्गत असलेल्या शेतातील आऊट हाऊसमध्ये राहते. तिची आई जायसवालच्या शेतात मजुरी करते. दोन्ही मुलीही तिच्यासोबत काम करतात. जून महिन्यात पीडित मुलीच्या १५ वर्षाच्या लहान बहिणीवर भंडाऱ्याच्या एका युवकाने अपहरण करून अत्याचार केला होता. अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिला भंडाऱ्यावरून आणल्यानंतर चौकशीत अत्याचाराचा खुलासा झाला होता. त्याआधारे पोलिसांनी अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अद्यापही मिळालेला नाही. अपहरण आणि अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेच्या बहिणीची चौकशी करण्यासाठी मंगळवारी एका स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी घरी आले होते. चौकशीदरम्यान पोलिसांना जायसवालच्या शोषणाबाबत माहिती दिली. पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचार आणि तिच्या लहान बहिणीशी जायसवालने छेडखानी केल्याचे सांगितले. तिचे म्हणणे ऐकून स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी अवाक् झाले. त्यांनी नंदनवन पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तात्काळ महिला उपनिरीक्षक स्नेहलता जायेभाये यांना प्रकरणाचा तपास सोपविला. पीडितेने चौकशीत घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीनुसार जायसवाल त्यांना तीन वर्षांपासून त्रास देत होता. त्याने पीडितेला तिच्या आईच्या सहकार्याने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. जायसवालच्या कृत्याची माहिती झाल्यानंतरही तिच्या आईने त्याला विरोध केला नाही.उलट ती मुलीला जायसवालसोबत जाण्यास सांगत होती. जायसवाल तिला एकदा हैदराबादला घेऊन गेला होता. तेथेही त्याने तिला झोपेची गोळी देऊन अत्याचार केला. याशिवाय इतर एका ठिकाणी नेऊनही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या लहान बहिणीलाही कार्यालयात बोलावून छेडखानी केली. जायसवाल आणि पीडितेच्या आईने याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या बयानाच्या आधारे पोलिसांनी अत्याचार, छेडखानी, धमकी देणे आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्वरित जायसवालचे घर गाठले. परंतु तो फरार झाला होता.आईची माहिती देण्यास टाळाटाळपोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईची चौकशी केली असता, ती घटनेचा इन्कार करीत आहे. तिने मुलीला २०१६ मध्ये हैदराबादला पाठविले होते. त्याबाबतही ती समाधानकारक उत्तर देत नाही. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलिसही अल्पवयीन मुलीच्या चौकशीत संयम ठेवत आहे. जून महिन्यात अपहरण आणि अत्याचार प्रकरणात पोलिसांनी लहान बहिणीची चौकशी केली होती. तिला आईसोबत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी तिने जायसवालच्या कृत्याची माहिती दिली नव्हती. आईच्या उपस्थितीत चौकशी केल्यामुळे तिने खरी हकीकत सांगितली नसल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलीची आई अनेक दिवसांपासून जायसवालच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. नंदनवनचे ठाणेदार यशवंत चव्हाण यांनी पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करीत असून, जायसवालची माहिती मिळाल्यानंतरच तपास होऊ शकणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार