शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे धान्य उघड्यावर

By admin | Updated: April 12, 2015 02:32 IST

कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे.

नागपूर : कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे. अचानक बदलत असलेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नुकसानीची भीती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने येणाऱ्या शेतमालाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, सभापती, संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. कळमना मार्केटमध्ये गहू, चणा, तूर, धानाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गोदाम भरली असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल उघड्यावरच ठेवला आहे. गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांजवळ स्वत:च्या ताडपत्र्या नसल्याने, त्यांना तर चांगलाच फटका सहन करावा लागला. ज्यांनी ताडपत्र्या झाकल्या, त्यांचेही धान्याचे पोते खालून ओले झाले. धान्य ओले झाल्यामुळे शुक्रवारी परत शेतकऱ्यांना माल काढून वाळवावा लागला. माल स्वच्छ करून ठेवण्यासाठी पुन्हा हमाली द्यावी लागली. पाण्यामुळे चणा डागी लागला होता. गव्हू काळा पडला होता. नुकसान झालेले बहुतांश शेतकरी हे नागपूर व जवळच्या जिल्ह्यातील आहे. तीन ते चार दिवसापासून ते आपला शेतमाल विक्रीसाठी कळमन्यात घेऊन आले आहे. दरवर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमालाच्या सुरक्षेसाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)