कारच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:13+5:302021-06-24T04:07:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : अनियंत्रित भरधाव कारचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वार मायलेकाचा घटनास्थळीच ...

Mileka dies in car crash | कारच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू

कारच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : अनियंत्रित भरधाव कारचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वार मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर-जबलपूर महामार्गावरील लिहीगाव शिवारात बुधवारी

सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मनिषा गाेपाल खुरपडी (३९) व अनिकेत गाेपाल खुरपडी (२२) दाेन्ही रा. गादा, ता. कामठी, अशी मृत मायलेकाची नावे आहेत. मृत अनिकेत हा आपल्या आईसाेबत एमएच-४०/बीएम-३९१४ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने उमरेड तालुक्यातील वडद येथून लिहीगावमार्गे गादा गावी परत येत हाेते. दरम्यान, लिहीगाव शिवारात मागून येणाऱ्या एमएच-४९/बीके-१७११ क्रमांकाच्या अनियंत्रित भरधाव कारने त्यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीला जाेरात धडक दिली. ही धडक इतकी जाेरदार हाेती की, दुचाकी अक्षरश: राेडच्या कडेला फेकली गेली व कारच्या समाेरील भागाचा चुराडा झाला. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने अनिकेत व त्याची आई मनिषा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर आराेपी कारचालक तेथून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक श्याम वारंगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दाेघाचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी आराेपी कारचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४, सहकलम १८४, १३४ अ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Mileka dies in car crash