मेट्रोच्या झिरो माईल्स, कस्तूरचंद पार्क स्टेशन व फ्रीडम पार्कचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:12 IST2021-08-20T04:12:19+5:302021-08-20T04:12:19+5:30

नागपूर : महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत झिरो माईल्स, कस्तूरचंद पार्क स्टेशन व मार्ग आणि फ्रीडम पार्क स्टेशनचे उद्घाटन शुक्रवार, २० ...

Metro's Zero Miles, Kasturchand Park Station and Freedom Park inaugurated today | मेट्रोच्या झिरो माईल्स, कस्तूरचंद पार्क स्टेशन व फ्रीडम पार्कचे आज उद्घाटन

मेट्रोच्या झिरो माईल्स, कस्तूरचंद पार्क स्टेशन व फ्रीडम पार्कचे आज उद्घाटन

नागपूर : महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत झिरो माईल्स, कस्तूरचंद पार्क स्टेशन व मार्ग आणि फ्रीडम पार्क स्टेशनचे उद्घाटन शुक्रवार, २० ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता आभासी पद्धतीने (व्हिडिओ लिंक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा झिरो माईल्स स्टेशनवर पार पडणार आहे.

१.६ किमी लांब या मार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव व महामेट्रोचे अध्यक्ष दुर्गा शंकर मिश्रा, महापौर दयाशंकर तिवारी, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. प्रवीण दटके, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री आ. अनिल देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. आशिष जयस्वाल, आ. राजू पारवे आणि आ. टेकचंद सावरकर उपस्थित राहतील.

Web Title: Metro's Zero Miles, Kasturchand Park Station and Freedom Park inaugurated today