शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे धावणार ५० टक्के क्षमतेने ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान नागपूर शहरात लॉकडाऊन केले आहे. ...

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान नागपूर शहरात लॉकडाऊन केले आहे. दरम्यान आवश्यक प्रवासी सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे महामेट्रोनेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो स्थानकावर सतर्कता बाळगण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मेट्रो रेल्वे ५० टक्के क्षमतेने चालविण्याचा महत्त्वाचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे.

मेट्रो रेल्वेच्या ऑरेंज लाईनवर सीताबडी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू राहणार आहे. तर अ‍ॅक्वा लाईनवर सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवाशांना सेवा देण्यात येईल. दरम्यान प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. विना मास्क प्रवाशांना मेट्रो स्थानकावर प्रवेश देण्यात येणार नाही. स्टेशनवर प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासण्यात येत आहे. यात कुणाचे तापमान अधिक वाटल्यास स्टेशन नियंत्रक याची माहिती आरोग्य विभागाला देणार आहेत. प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर देण्यात येईल. मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना हात धुवावे लागणार आहेत. मेट्रो ट्रेनमधून प्रवासी उतरल्यानंतरच इतर प्रवाशांना कोचमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवाशांनी लिफ्ट किंवा इतर उपकरणांच्या बटनांना, एस्केलेटर बारला हात लावू नये, याची काळजीही घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्टेशनवर काऊंटर तिकीट देण्याऐवजी डिजिटल पद्धतीने तिकीट देण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो रेल्वे, स्टेशनचे सातत्याने सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.

...........