शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरण शासनात विलीन करा

By admin | Updated: November 29, 2015 03:38 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासनात विलीन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली आहे.

ंसंघर्ष समितीची मागणी : काळ्या फिती लावून आंदोलनास प्रारंभनागपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासनात विलीन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली आहे. राज्यातील नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा आणि मलनि:सारण कार्यक्रमाचा जलद गतीने विकास व नियमन करण्यासाठी १९७१ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. येथील कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय सेवा नियम लागू आहेत. ३१ आॅक्टोबर १९८१ पर्यंत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अदा करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली होती. त्यानंतर ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आली. ई अ‍ॅण्ड पी शुल्क १७.५० टक्के ऐवजी ५ ते ९ टक्के कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाचा खर्च भागविणे हा प्राधिकरणापुढील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच संपूर्ण ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची कामे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली. तसेच नागरिक योजनांची कामेही स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित झाली. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा प्राधिकरण शासनात विलीन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. संघर्ष समितीने आंदोलनाची रुपरेषा निश्चित केली आहे. सध्या काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे. यानंतर ४ डिसेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन केले जाईल तर ७ डिसेंबरपासून धरणे आंदोलन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालविण्यात येणारी पाणी पुरवठा केंद्रे बंद करण्यात येतील, असा इशाराही संघटनेचे देवेंद्र लांडगे, राजेश हाडके, अनिल इंगळे, प्रकाश बोरेकर, दीपक धोटे आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)