शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

समाजामध्ये मानसिक आजार वाढताहेत

By admin | Updated: August 2, 2015 03:11 IST

वाढती स्पर्धा आणि तणावामुळे समाजामध्ये मानसिक आजार वाढत आहेत. अशा परिषदांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर समाजासाठी होणे आवश्यक आहे.

नितीन गडकरी : इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या परिषदेचे उद्घाटन नागपूर : वाढती स्पर्धा आणि तणावामुळे समाजामध्ये मानसिक आजार वाढत आहेत. अशा परिषदांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर समाजासाठी होणे आवश्यक आहे. युवा डॉक्टरांनी अशा परिषदेमधून आपले ज्ञान ‘अपडेट’ करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, नागपूर शाखेच्यावतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच्या उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध मानसिक रोगतज्ज्ञ व या परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर भावे, इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. एन. एन. राजू, डॉ. विनय कुमार, डॉ. जी.पी. राव, डॉ. टी. राव, डॉ. राजीव पळसोदकर, डॉ. विवेक क्रिपेकर आणि डॉ. सुशील गावंडे उपस्थित होते. ‘मानसिक आजारात दिल्या जाणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम’ या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी नागपुरातील सायकॅट्रिक सोसायटीने राष्ट्रीयस्तरावर आयोजित केलेल्या या परिषदेचे कौतुक करून सर्वांचे स्वागत केले. जिन्सचा आधार घेऊन औषधोपचारडॉ. सुधीर भावे म्हणाले, मानवी शरीरात २४ हजार जिन्स असतात. फार्मेको जिनोमिक स्टडीमुळे प्रत्येक जिन्स ओळखणे शक्य झाले आहे. या जिन्सच्या आधारावर रुग्णाला कुठले औषध दिल्यास तो लवकर बरा होऊ शकतो किंवा त्याला त्याचे दुष्परिणाम होणार नाही किंवा कमी होणार याबाबतची माहिती मिळू शकते. येणाऱ्या काळात ही सोय भारतातही उपलब्ध होणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा इतर रुग्णांसोबतच मनोरुग्णांनाही होणार आहे. मानसोपचारात प्रदीर्घ उपचाराची गरज असते. त्यामुळे साहजिकच अन्य रोगांच्या तुलनेत यात औषधांच्या दुष्परिणामांची शक्यता अधिक राहते. काही दुष्परिणाम कालांतराने दिसतात. त्याची लक्षणे वेळीच कशी ओळखावीत, यावर या परिषदेत विचारमंथन होत आहे. परिषदेत डॉ. विहांग वाहिया, डॉ. नीलेश शहा डॉ. चित्तरंजन अंद्राडे (बेंगळुरू) यांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. भावे यांच्यासह डॉ. राजेंद्र सारडा, डॉ. प्रवीर वराडकर, डॉ. अभिषेक सोमाणी, डॉ. राजीव पळसोडकर परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)