शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या मृत्यूने मेडिकलमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकलमध्ये दाखल असलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीला इंजेक्शन लावल्यानंतर तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेडिकलमध्ये दाखल असलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीला इंजेक्शन लावल्यानंतर तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी चुकीच्या उपचारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अनिका शिवकुमार शाहू असे मृत मुलीचे नाव आहे. ती सक्करदऱ्यातील कॉर्पोरेशन शाळेजवळ राहत होती. अनिकाला फिट येण्याचा आजार होता. तिला तिच्या पालकांनी शनिवारी सायंकाळी मेडिकलमध्ये दाखल केले. रविवारी दुपारी ३च्या सुमारास मेडिकलच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन लावले. त्यानंतर, काही वेळेतच ती मृत झाली. त्यामुळे अनिकाचे नातेवाईक संतप्त झाले. चुकीचे इंजेक्शन लावल्यामुळेच अनिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला. त्यांनी रोष व्यक्त केल्याने मेडिकलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच अजनीचे पोलीस पथक तेथे पोहोचले. दरम्यान, अनिकाचे वडील शिवकुमार फुलचंद शाहू (वय ३०) यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रकरण सक्करदरा पोलिसांकडे वर्ग केले. या प्रकरणात सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

- शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच काही बोलता येईल...

तीन वर्षांची ती मुलगी जन्मत: दिव्यांग होती. तिला झटक्यांचा आजार होता. यापूर्वी ती बऱ्याच वेळा रुग्णालयात येऊन उपचार घेतला. शनिवारी सायंकाळी तिला झटके सुरू झाल्याने मेडिकलच्या बालरोग विभागातील ‘आयसीयू’मध्ये भरती करण्यात आले होते. आज दुपारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिच्या वडिलाच्या तक्रारीवरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावरच काही बोलता येईल. रविवारी तिला अ‍ॅण्टीबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते.

-डॉ.दीप्ती जैन

प्रमुख, बालरोग विभाग, मेडिकल

---