शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय निष्काळजीपणाची याचिका फेटाळली

By admin | Updated: July 1, 2014 00:52 IST

खामला येथील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात २१ एप्रिल २०१२ रोजी परासिया (छिंदवाडा) येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्ट : वैद्यकीय मंडळाने नाकारले आरोपनागपूर : खामला येथील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात २१ एप्रिल २०१२ रोजी परासिया (छिंदवाडा) येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय मंडळाचा अहवाल तपासल्यानंतर फेटाळून लावली आहे.नंदेशकुमार पहाडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांची आई दुखवतीबाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा आरोप लावून याप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी व रुग्णालयाने पाच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी याचिकाकर्त्याची विनंती होती. न्यायालयाने ११ डिसेंबर २०१३ रोजी मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, वैद्यकीय मंडळाने गेल्या २९ जानेवारी रोजी अहवाल सादर करून उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळीपणा झाल्याच्या आरोपाचे खंडन केले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. न्हाणीघरात पडल्यामुळे दुखवतीबाईच्या हाताचे हाड तुटले होते. त्यांना २० एप्रिल २०१२ रोजी सकाळी ८ वाजता शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले. काही वेळानंतर त्यांना शस्त्रक्रिया न करताच बाहेर आणले. तेव्हा त्या मृत्यू झाल्याप्रमाणे निपचित पडल्या होत्या. परंतु, डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना मृत घोषित केले.यामुळे पहाडे यांनी तत्काळ धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. रुग्णालय व्यवस्थापन मृत्यूमागचे खरे कारण लपवत आहे, असा पहाडे यांचा आरोप होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. राहुल कुरेकार, तर शासनातर्फे एपीपी संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)