शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय गरजेचे :  नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:24 AM

वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

ठळक मुद्देअ‍ॅमिसकॉन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जास्तीत जास्त कौशल्यप्राप्त डॉक्टर निर्माण होण्यासाठी आणि गरीब रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या महानगराप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना होणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.‘असोसिएशन ऑफ मिनीमल एक्सेस सर्जन्स ऑफ इंडिया’च्या वतीने गुरुवारी सुरेश भट सभागृहात आयोजित ‘अ‍ॅमिस्कॉन २०१९’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, परिषदेचे संयोजक डॉ. प्रशांत रहाटे, संयोजन अध्यक्ष डॉ. दिलीप गोडे, अ‍ॅमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू उपस्थित होते.गडकरी म्हणाले, खासगी क्षेत्राला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढतील व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या रोजगारामध्येही वाढ होईल. भारतातील डॉक्टरांची ख्याती ही जगभर पसरली आहे. इंग्लंड तसेच अमेरिकेतसुद्धा त्यांना चांगली मागणी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते डॉ. आमटे यांना ‘अ‍ॅमासी’ ही फेलोशिप प्रदान करून सन्मानित करण्यात आले.डॉ. आमटे म्हणाले, भामरागड परिसरात प्रारंभीच्या काळात आमची झोपडी होती. झाडाखाली दवाखाना काढला, परंतु रुग्ण नव्हते. भाषा कळत नव्हती. त्या लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्नपूर्वक काम केले. कुणाच्या तरी आपण कामात येत आहोत, हे समाधान होते. पैशांपेक्षा कितीतरी पटीने ते मोठे आहे, असेही डॉ. आमटे म्हणाले.भारतीय शल्यचिकित्सकेची परंपरा ही पाच हजार वर्षे जुनी आहे. प्राचीन वैद्यकशास्त्राची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असल्याचे अ‍ॅमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू यांनी यावेळी सांगितले. या परिषदेत सर्जरीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसोबतच १५०० वर प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर