शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मी धरा वसुंधरा...’ संगीतमय नजराणा स्वरसाधनातर्फे आयोजन

By admin | Updated: May 12, 2014 01:02 IST

स्वरसाधना संस्थेच्यावतीने जागतिक मातृदिनानिमित्त रविवारी सकल सजीव सृष्टीचे संवर्धन करणार्‍या वसुंधरेप्रति कृतज्ञता व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या ‘मी धरा वसुंधरा...’

: पर्यावरण रक्षणाचा संदेश

नागपूर : स्वरसाधना संस्थेच्यावतीने जागतिक मातृदिनानिमित्त रविवारी सकल सजीव सृष्टीचे संवर्धन करणार्‍या वसुंधरेप्रति कृतज्ञता व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या ‘मी धरा वसुंधरा...’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संयोजक चैतन्य मोहाडीकर यांची होती. यावेळी पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह सुचित्रा कातरकर रचित रचनांचे संगीतमय सादरीकरणही झाले. या गीत सादरीकरणाच्या समवेत प्रतिभावान चित्रकार नाना मिसाळ यांनी कलात्मकतेने रेखाटलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विजय घुसे, डॉ. विरल कामदार, डॉ. राजकुमार खापेकर, ज्येष्ठ पत्रकार श्याम पात्रीकर, ग्राहक मंचाच्या डॉ. कल्पना उपाध्याय, विद्या लुले, सुचित्रा कातरकर व स्वरसाधना संस्थेचे कार्याध्यक्ष संजय चिंचोळे उपस्थित होते. सुरुवातीला स्वरसाधना संस्थेचे शिल्पकार पं. प्रभाकर देशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर आलाप संगीतच्या संचालिका अंजली निसळ यांनी पं. देशकरांबद्दल भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. दरम्यान डॉ. विजय घुसे यांनी सजीव सृष्टी ज्या पंचमहाभूतांवर टिकून आहे, त्याच्या रक्षणाची अनिवार्यता विषद करून, पाणी,जमीन व जंगलाच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. अजय पाटील यांनी ग्लोबल वार्मिंगचा वाढता धोका लक्षात घेऊ न पृथ्वीच्या रक्षणाचे आवाहन केले. शिवाय या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्राहक मंचाच्या ‘वसुंधरा’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. यानंतर सुचित्रा कातरकर रचित स्वरांकित रचनांच्या सुमधूर कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यात सुचित्रा कातरकरांसह श्याम देशपांडे, विजय देशपांडे, पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, छाया सरोदे, साक्षी सरोदे, जान्हवी हरिदास, कैवल्य केजकर, साक्षात कट्यारमल यांनी भाग घेतला होता. दरम्यान ‘निसर्ग पूजन..., रंगबावरी झाले रे मी.., डोळे झाले ग पाखरू..., दिस पावसाचे आले..., ये मोगरा फुलून..’ अशी २० पेक्षा अधिक निसर्ग गीते गायली. प्रभा देऊ स्कर यांनी निवेदन केले. विनय ढोक, गोविंद गडीकर, विजय देशपांडे, सुधीर गोसावी, गजानन रानडे यांनी वाद्यावर साथ दिली. (प्रतिनिधी)