शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

‘मोडी लिपी’चा जन्मदाता दुर्लक्षित

By admin | Updated: July 26, 2015 03:17 IST

वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, ...

नागपूर : वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, त्या ‘मोडी लिपी’चा जनक असलेला भाट समाज आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे. शेकडो वर्षांपासून भटकंती करूनच आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भाट समाजाची नोंद शासनदरबारी भटक्या विमुक्ताच्या वर्गात नसल्याने अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे. परिणामी गरिबीत खितपत पडलेल्या समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जुन्या काळात अनेक लोकं आपली वंशावळी लिहून ठेवायचे. वंशावळ लिहून ठेवण्याचे काम भाट समाज करायचे. ज्या लिपीमध्ये ही वंशावळी लिहून ठेवली जायची त्याला मोरी लिपी किंवा प्रचलित भाषेत मोडी लिपी असे म्हटले जाते. ही लिपी केवळ भाटांनाच लिहिता वाचता येत असल्याने त्याला भाटाची लिपी सुद्धा म्हटले जाते. या लिपीचा शोध कधी लागला याचा फारसा उल्लेख नसला तरी ही लिपी भाट समाजात पारंपरिक पद्धतीने आली. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. त्यामुळे या लिपीचा जन्मदाता हा भाट समाज असल्याचे मानले जाते. परंतु आधुनिकतेच्या काळात ही लिपी नामशेष व कालबाह्य झाली आहे. त्यामुळे भाट समाजाचा उदरनिर्वाह कधीचाच हिरावला गेला. आज या समाजाचे लोक तांड्यावर राहतात. मिळेल ते काम करतात. गावोगावी फिरून लोकांची वंशावळी लिहिण्याचे काम हा समाज करीत होता. परंतु शासन दरबारी भाट समाजाची नोंद ही ओबीसी प्रवर्गात करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही भटके विमुक्त असल्याने आमची नोंद भटके विमुक्त वर्गात करण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज लढा देत आहे. हा लढा केवळ शासनाच्या योयी सवलती मिळण्यासाठी नसून आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी आहे. आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात भाट समाजाची लोकसंख्या केवळ दीड लाख आहे. काही बोटावर मोजण्यासारखी मंडळी सोडली तर हा समाज आजही डोंगरदऱ्यात राहतो. उदरनिर्वाहासाठी सातत्याने भटकंती करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकतीच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. त्यात सर्वाधिक संख्या भाट समाजातील मुलांची होती. अशा परिस्थितीत गरिबीत खितपत पडलेल्या या समाजाला शासनाच्या मदतीची गरज आहे. (प्रतिनिधी)