शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकर्मा घोटाळ्यात व्यवस्थापक-लेखापाल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विश्वकर्मा बिगरशेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या घोटाळ्यात वित्त गुन्हे शाखेने संस्थेचे व्यवस्थापक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विश्वकर्मा बिगरशेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या घोटाळ्यात वित्त गुन्हे शाखेने संस्थेचे व्यवस्थापक व महिला लेखापालास अटक केली आहे. दिगंबर येवले (रा. भोलेबाबा नगर, हुडकेश्वर) तथा स्वर्णा प्रमोद कोकडे हे या प्रकरणातील आरोपी आहेत.

२००५ मध्ये पतसंस्थेची सुरुवात झाली होती. पतसंस्था वेगवेगळ्या योजनांतर्गत जमा राशी स्वीकारणे व कर्ज वितरणाचे कार्य करते. २०१६ ते २०१९ दरम्यान जवळपास सव्वा दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला होता. नियमांकडे दुर्लक्ष करून वेगवेगळ्या मार्गाने कर्ज वितरित करण्यात आले होते. पतसंस्थेत घोटाळा झाल्याची तक्रार मिळाल्यावर लेखापरीक्षक पुंडलिक पालांदूरकर यांनी लेखापरीक्षण केले. त्यात सव्वा दोन कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. त्याच आधारावर वाठोडा पोलीस ठाण्यात फसवणूक व महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) अंतर्गत प्रकरणाची नोंद करण्यात आली. १५ जानेवारीला प्रकरणाचा तपास वित्त गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वित्त शाखेने ३० जानेवारीला यात पुरुषोत्तम तुळशीदास बेले (४९, रा. सर्वश्रीनगर), नरेश तुळशीराम दांडेकर (४७, रा. शारदा चौक, अयोध्यानगर) व वासुदेव विठोबाजी हिरूडकर (४८, रा. आनंदनगर, सक्करदरा) यांना अटक केली. गुरुवारपासून ते पोलिसांच्या तावडीत आहेत. तपासाच्या अनुषंगाने आज सकाळी दिगंबर येवले व स्वर्णा कोकडे यांना अटक करण्यात आली. त्यांना ६ फेब्रवारीपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. येवलेचे हुडकेश्वर येथे मोठे घर आहे. पोलीस त्याच्या उत्पन्नाचा तपास करत आहेत. वित्त शाखेचे डीसीपी विवेक मसाळ यांनी पतसंस्थेकडून झालेल्या फसवणुकीला बळी पडणाऱ्या नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

.........