शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : जनतेचे फोन टाळणार नाही तर तातडीने दखल घेणार : विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:42 IST

जनतेचे प्रश्न सोडविण्याची ताकद मिळण्यासाठीच मी ही निवडणूक लढत आहे, असे मत पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअनंतनगरमध्ये सभा, पदयात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एखाद्या नागरिकाने एखाद्या कामासाठी फोन केला तर मी मुंबईला आहे, पक्षाच्या बैठकीत आहे, महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे, असे सांगणाऱ्यांपैकी मी नाही. नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी सर्व कामे बाजूला सारून मी धावून गेलो आहे. मी जनतेला दूर सारणारा नाही तर जनतेत राहणारा माणूस आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याची ताकद मिळण्यासाठीच मी ही निवडणूक लढत आहे, असे मत पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.पश्चिम नागपुरातील अनंतनगर येथे शुक्रवारी आयोजित सभेत बोलताना विकास ठाकरे म्हणाले, नागरिकांचे घरटॅक्स वाढविण्यात आले. पाणी बिलात मोठी वाढ झाली. या विरोधात गेली पाच वर्षे आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी आपण आवाज उठविल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे यांच्या प्रचारासाठी दीपकनगर व नाग विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथे दिनकर वानखेडे, ताराचंद सोमकुवर, रामू क्षत्रिय, दिलीप घोडीचोर, डी.डी.गजभिये, रमेश इंगोले, शर्मा दाई आदींनी पदयात्रा काढली. गांधीनगरमधून बाईक रॅली काढण्यात आली. राजेश उघडे, भाऊ भालेकर, संजय सरायकर, उमेश पिंपळे, गीता बाजपयी, हरी यादव, महादेव चौधरी, मुकुंद उइके,शत्रुघ्न महतो, अतुल तांबे, जीत कनोजिया, विनोद सगरकर, राजेश रामधम, पंकज बोन्द्रे, अमित वैरागडे आदी सहभागी झाले. टीव्ही टॉवर मानसेवानगर येथील जाहीर सभेत सभेला वृंदा ठाकरे, अ‍ॅड. रेखा बाराहाते, नविता चोपकर ,मंदा कोल्हटकर, राजेश रामधम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vikas Thakreविकास ठाकरेnagpur-west-acनागपूर पश्चिम