शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019  : बावनकुळेंच्या नव्या जोमाने कार्यकर्त्यांना ऊर्जा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:20 IST

काहीसे नैराश्य आणि कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या स्वभावाप्रमाणे जोशात कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देपूर्व विदर्भाची प्रचार धुरा सांभाळली : शहा, फडणवीस, गडकरींनी टाकला विश्वास

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी वाटपाच्या वेळी भाजपमध्ये महानाट्य घडून शेवटच्या क्षणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. हा बराच मोठा धक्का मानला जात होता. यात अंतर्गत राजकारण झाले अशा विविध अफवा, वावड्या निर्माण झाल्या. परंतु असे काही नसल्याचे दोन दिवसात स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बावनकुळे यांची पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली. या माध्यमातून बावनकुळे यांच्याकडे ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आली आहे.काहीसे नैराश्य आणि कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून बावनकुळे आपल्या स्वभावाप्रमाणे जोशात कामाला लागले आहेत. पूर्व विदर्भासोबतच त्यांच्या जनसंपर्क आणि मंत्री म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदा पक्षाने विदर्भातील आणि इतरही मतदारसंघात घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चिखली (बुलढाणा), कारंजा (वाशिम) व धारणी (अमरावती) येथील जाहीर सभेत बावकुळे हे शहांसोबत पूर्णवेळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात प्रचार करीत असताना बावनकुळे त्यांच्यासोबत पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या साकोली (भंडारा) येथील सभेत बावनकुळे यांना मानाचे स्थान देण्यात आले.पालकमंत्री या नात्याने भंडारा, गोंदिया, नागपूर व वर्धा या चार जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. पक्षाला त्याची जाणीव असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत त्यांना नव्या जोमाने कामाला लावले आहे. कामठीच्या सभेत नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचा गौरव करीत त्यांचा पूर्ण सन्मान जपला जाईल, असे जाहीर वचन नागरिकांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली आहे.सकाळी ७ ते रात्री २ प्रचार !सध्या बावनकुळे हे सकाळी ७ पासून प्रचाराला निघतात आणि रात्री २ वाजता घरी येतात. घरी आल्यानंतरही एक तास पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतात. प्रत्यक्ष फोनवर प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घेतात व तातडीने सोडवितात. प्रत्येक जिल्ह्यातील बूथ प्रमुख, पेज प्रमुख यांच्याशी थेट संपर्क साधून प्रचारासंबंधी बारीकसारीक माहिती घेतात. आलेली माहिती रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिल्लीतील पक्ष नेतृत्वाला देतात. भाजपचे सर्वच नेते त्यांचा उल्लेख ऊर्जावान मंत्री म्हणून करीत होते. आता नव्या जोमाने कामाला लागून त्यांचा ऊर्जावान संघटन कौशल्याचा अनुभव भाजप कार्यकर्ते घेत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे